माती परीक्षण केल्यानंतर मातीमध्ये असणाऱ्या पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक घटकांचे प्रमाण योग्य असेल तर जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.
पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने मातीमध्ये असणारे घटक व त्यांचे योग्य प्रमाण असावे, असे काही संकेत आहेत. जर मातीतील घटकांचे प्रमाण योग्य असेल तर मातीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.
यापेक्षा प्रमाण कमी किंवा जास्त आढळले तर मातीच्या आरोग्यावर उत्पादनावर परिणाम होतो. यासाठी माती परीक्षण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
मातीमध्ये असणारे घटक व त्यांचे योग्य प्रमाण
१) सामू (पीएच) ५.५ ते ७.५
२) क्षारता (ईसी) ० ते १.००
३) सेंद्रिय कार्बन (ओसी) ०.४०-६०%
४) नत्र २८० ते ४२० किलो प्रतिहेक्टर
५) स्फुरद १४ ते २१ किलो प्रतिहेक्टर
६) पालाश १५० ते २०० किलो प्रतिहेक्टर
७) कॉपर (तांबे) ०.२०-२९.९९ पीपीएम
८) लोह (फेरस) ४.५-९९.९९ पीपीएम
९) जस्त (झिंक) ०.६१-९९.९९
१०) मंगल २.०० ते ९९.९९
११) बोरॉन ०.१ ते ०.५ पीपीएम
१२) मॅग्नेशियम ०.०३ ते ०.८४ पीपीएम
१३) मॉलिब्लेडम ०.०३ ते ०.०६ पीपीएम
१४) गंधक १० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम
१५) युक्त सोडियम ० ते ५.०० याप्रमाणे असावे.
- सुनील यादव
उपविभागीय कृषी अधिकारी
जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी कार्यालय, सातारा
अधिक वाचा: सुधारित पंचनामे पूर्ण, आकडा वाढला; 'या' सहा जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून मिळणार अतिरिक्त मदत
