Join us

बिन पाण्याचा हवेवरचा गहू; पेरणी झाली की थेट काढणीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:26 IST

खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर जिगरबाज दुष्काळी शेतकऱ्यांनी निसर्गावर मात करीत रबी हंगामातील बिनपाण्याचा गहू पिकविण्याची आणि चांगले उत्पन्न घेण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. कोणतेही खत व औषधांशिवाय या गव्हाचे उत्पन्न घेतले जात असून पेरणी झाल्यानंतर थेट काढणीसाठी शेतक यांना लागत आहे.

दिलीप मोहितेविटा: खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर जिगरबाज दुष्काळी शेतकऱ्यांनी निसर्गावर मात करीत रब्बी हंगामातील बिनपाण्याचा गहू पिकविण्याची आणि चांगले उत्पन्न घेण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. कोणतेही खत व औषधांशिवाय या गव्हाचे उत्पन्न घेतले जात असून पेरणी झाल्यानंतर थेट काढणीसाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे.

शेतात जावे घाटमाथ्यावरील रेवणगाव, रेणावी, घोटी खुर्द, ऐनवाडी, धोंडगेवाडी, घोटी बुद्रुक, अडसरवाडी, जाधववाडी यासह परिसरातील अन्य काही गावांत आक्टोबर महिन्यातील पावसाच्या कमी ओलसर जमिनीत या बिनपाण्याच्या म्हणजेच शेत गव्हाची पेरणी केली जाते. घाटमाथ्याचा हा पट्टा कमी पावसाचा असल्याने केवळ पेरणीपूर्वीच्या कमी ओलसर जमिनीत हा गहू मोठ्या प्रमाणात डौलत असतो.

रब्बी हंगामातील हरभरा पिकांप्रमाणे फक्त थंड हवेवर या गव्हाचे उत्पन्न घेतले जाते. पाऊसमान कमी आणि सिंचनाची कोणतीही व्यवस्था नसल्याने केवळ निसर्गाच्या भरवशावरच येथील शेतकरी पिकांची पेरणी करतात. त्याचाच एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच दसरा-दिवाळीच्या आसपास शेतकरी बिनपाण्याच्या गव्हाची पेरणी करतात. या गव्हाची उंची साधारणच असते; पण एकदा पाऊस झाला तर पाणगव्हापेक्षाही मोठा आणि उत्पन्नात भरीव काम करतो; परंतु ऑक्टोबरनंतर पाऊसच नसल्याने केवळ थंड हवेवर हा गहू पिकतो. एकरी पाच ते सात क्विंटल उत्पन्न देणारा हा बिनपाण्याचा गहू चवीला अत्यंत स्वादिष्ट असतो. त्याच्या पोळ्या व चपात्या लालसर होत असल्या तरी पचनाला हलक्या असतात. या बियाणांची उगवण क्षमता ९० ते ९५ टक्के इतकी चांगली असते.

शेती पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याशिवाय पिके घ्यावी लागतात. त्यातील बिनपाण्याचा हा गव्हू गेल्या अनेक पिढ्यापासून या भागात पिकत आहे. शेतकरीही त्यासाठी पसंती देतात, पाण्याच्या गव्हापेक्षा एकरी थोडे कमी उत्पन्न मिळत असले तरी केवळ हवेवर हा गहू पिकत असल्याने कोणताही खर्च करावा लागत नाहीच, शिवाय तो खाण्यास स्वादिष्ट व रुचकर असतो. - शहाजी मुळीक, शेतकरी, रेवणगाव

टॅग्स :गहूशेतकरीशेतीपीकदुष्काळरब्बीखानापूर