१ जानेवारीपासून स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरणात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये गव्हाचा कोटा वाढविण्यात आला आहे. तर तांदळाचा कोटा कमी करण्यात आला आहे.
याशिवाय स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय ग्राहकांना साखरेचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे अंत्योदय ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. तर इतर ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुरवठा विभागाला धान्य वितरणामध्ये काही महत्त्वाचे बदल सुचविण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यामुळे पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानातील ग्राहकांना धान्य मिळविताना नवे फेरबदल पाहायला मिळणार आहेत.
ग्राहकांकडून गहू आणि तांदळाचा कोटा वाढविण्यासाठी रेटा होता. प्रत्यक्षात यात गव्हाचा कोटा वाढविण्यात आला आहे. तर तांदळाचा कोटा कमी करण्यात आला आहे.
पूर्वी स्वस्त धान्य दुकानामधून अंत्योदय कार्डधारकांना १५ किलो तांदूळ आणि २० किलो गहू मिळत होते.
प्राधान्य गटाच्या धान्यातही बदल
◼️ प्राधान्य कार्डधारकांच्या वितरणातही बदल करण्यात आले आहे.
◼️ या कार्डधारकांना पूर्वी दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळत होते.
◼️ आता ३ किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार आहे.
◼️ यात एक किलोने तांदळाचा कोटा कमी करण्यात आला आहे. तर गव्हाचा कोटा वाढविला आहे.
अधिक वाचा: Koyna Dam : कोयना धरणाचे नाव बदलणार; आता धरणाला ओळखले जाणार 'ह्या' नवीन नावाने
