राज्यात सर्वत्र सध्या गहू काढणीस आला आहे. यासाठी शेतकरी आतापासूच हार्वेस्टर बुकींग करण्यावर भर देत आहेत. अर्धा ते पाऊण तासात एक एकर क्षेत्रातील गहू कापणी करुन थेट ट्रॉलीत जात असल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहे.
पारंपरिक सोंगणी, मळणी करिता मोठ्या प्रमाणात मंजुरांची गरज भासते. मात्र अलीकडे मजुरीचे वाढलेले दर तसेच मजुरांची कमतरता यामुळे शेतकेरी आता हार्वेस्टर द्वारे गहू काढणीस प्राधान्य देत आहे. तसेच मोठे क्षेत्र असलेले शेतकरी मजूरांऐवजी हार्वेस्टरद्वारे गहू काढणी करण्यास गेल्या काही वर्षांपासून प्राधान्य देत आहे.
मार्चपासून सुरुवात होण्याची शक्यता
सध्या तुरळक गहू काढणीस आला आहे. मात्र सर्वत्र गहू कापणीला मार्च मध्ये प्रारंभ होण्याची शक्यता आहे. यंदा बाजारात दर चांगले मिळणार असल्याने शेतकरी गहू कापणी करुन बाजारात आणण्याच्या विचारात आहेत.
मजूर, मळणीयंत्र मिळेना; विजेची समस्या
मजूरांकडून कापणी करुन घेणे अवघड झाले आहे. इतर जिल्ह्यातून मजूर स्थलांतरीत होतात. यातून शेतकऱ्यांना अडचणी येतात. यामुळे हार्वेस्टरला सर्वत्र पसंती आहे.
मळणीयंत्राचे दाम परवडेना
मजूरांकडून कापणी केल्यावर पुन्हा मळणीसाठी यंत्र भाड्याने आणावे लागते. यात वेळ अधिक जात असल्याने शेतकरी आता हार्वेस्टरचा पर्याय निवडत आहेत. यामुळे शेतशिवारात गहू कापणीसाठी हार्वेस्टर दिसून येतात.
परराज्यातून हार्वेस्टर दाखल
राज्यात गहू पट्ट्यात सर्वत्र पंजाब राज्यातून हार्वेस्टर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
हार्वेस्टरचे प्रतिएकर रेट काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या ३००० रुपये एकर या दराने हार्वेस्टरद्वारे गहू कापणी करुन देण्यात येते आहे. तर सर्वत्र काढणी सुरू झाल्यास या दरात काहींसी घट होण्याची शक्यता असल्याचे देखील हार्वेस्टर चालक सांगतात.