Join us

सर्पदंश झाल्यास काय टाळावे अन् काय करावे? जीव वाचवणारी माहिती प्रत्येकाने जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 19:40 IST

राज्यात अनेक ठिकाणी सर्पदंशाच्या घटना वाढू लागतात. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर किंवा घराजवळ झाडा-झुडपांमध्ये फिरणाऱ्या व्यक्तींना साप चावण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी भीती आणि घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेऊन पीडित व्यक्तीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते.

राज्यात अनेक ठिकाणी सर्पदंशाच्या घटना वाढू लागतात. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर किंवा घराजवळ झाडा-झुडपांमध्ये फिरणाऱ्या व्यक्तींना साप चावण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी भीती आणि घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेऊन पीडित व्यक्तीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्पदंश झाल्यास कोणती काळजी घ्यावी आणि काय टाळावे याची योग्य माहिती असणे अत्यावश्यक आहे.

विशेषतः साप चावल्यास तत्काळ १०८ किंवा जवळच्या रुग्णवाहिकेला कॉल करणे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. तोपर्यंत पीडित व्यक्तीला शांत ठेवणे एका जागी झोपवणे आणि हालचाल कमी करणे आवश्यक असते. हालचालीमुळे विष शरीरात जलद पसरू शकते याची नोंद घ्यावी.

दंशाच्या ठिकाणी जखमेच्या थोड्या वरच्या भागात दाब पट्टी बांधावी परंतु ती खूप घट्ट नसावी. अंगठी, बांगड्या, घट्ट कपडे काढावेत जेणेकरून सूज वाढून रक्तप्रवाह अडथळा येणार नाही. काही वेळा भीतीमुळे पीडित व्यक्ती खचून जातो अशावेळी त्याला धीर देणे आणि मानसिक आधार देणे फार गरजेचे असते.

सर्पदंशाची लक्षणे विषारी आणि बिनविषारी सापांनुसार बदलतात. विषारी साप चावल्यास दंशाच्या ठिकाणी सूज, वेदना, लालसरपणा, दोन दातांचे खुणा दिसणे यासह मळमळ, उलटी, चक्कर, अर्धांगवायू यासारखी गंभीर लक्षणे दिसतात. त्यामुळे डॉक्टरांकडून त्वरित तपासणी आणि आवश्यक ते उपचार घेणे आवश्यक आहे.

काय करू नये?

• चावलेली जागा कापू नये किंवा चोखू नये.

• विष शोषण्याचा प्रयत्न करू नका.

• रुग्णाला पळवू नका किंवा शारीरिक हालचाल करू देऊ नका.

• कॅफिन किंवा अल्कोहोल देऊ नका.

मग नक्की काय करावे?

• रुग्णवाहिकेला फोन करा (१०८)

• रुग्ण शांत राहील याची काळजी घ्या

• हलका दाबपट्टी थर बांधा

• दागिने व घट्ट वस्त्रं काढा

• वैद्यकीय मदतीची वाट पाहताना रुग्णाला धीर द्या

• शक्य असल्यास सापाचा प्रकार लक्षात ठेवा आणि डॉक्टरांना सांगा

• सर्पदंश ही आपत्कालीन वैद्यकीय स्थिती असते. योग्य वेळी घेतलेली प्राथमिक काळजी आणि तात्काळ उपचार जीव वाचवू शकतात.

साप चावल्यानंतर तज्ज्ञांच्या मते, हा एक वैद्यकीय आणीबाणीचा घटक आहे आणि त्वरित वैद्यकीय मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. विषारी सापाच्या चाव्यामुळे जर वेळेवर उपचार न मिळाले तर तीव्र रक्तस्त्राव, स्नायूंचे दुर्बलपणा, श्वासोच्छवासात अडचणी, पक्षाघात आणि गंभीर प्राणघातक परिणाम होऊ शकतात. नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे. - डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा.

हेही वाचा : गवतात आढळणारा 'हा' किडा चावल्याने होतो स्क्रब टायफस आजार; वेळीच लक्ष न दिल्यास ठरू शकतो प्राणघातक 

टॅग्स :शेती क्षेत्रसापआरोग्यहेल्थ टिप्सशेतकरीशेती