Join us

वाढत्या तापमानाचा काय होतोय बाजारपेठेवर परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 09:18 IST

बाजार समितींमध्ये शेतकरी पेक्षा व्यापारीच अधिक

मागील पंधरवड्यापासून प्रखर ऊन पडत असून, दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार भागात मागील पंधरवड्यापासून अधूनमधून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मारा होत आहे.

वातावरणातील बदलामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दिवसभर उन्हाची रखरखताही वाढत आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम राहत आहे. अशा वाढत्या उन्हात नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले असून, दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.

भुसार मालाची खरेदी-विक्री मंदावली

जवळा बाजार येथील उपबाजार समितीत शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी शेतकरी बांधवांची नेहमीच गर्दी असते. मात्र प्रखर उन्हामुळे या बाजारावरही परिणाम झाला आहे. उन्हाच्या तीव्र लहरींमुळे बाजार समितीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे.

तसेच यंदा दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली असल्याने अनेक शेतकर्‍यांना कमी उत्पादन मिळाले आहे. ज्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची आवक मंदावली आहे. तसेच खरेदीदारांची गर्दीही कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

हेही वाचा - अलीकडे का झाले अनेक दूध उत्पादकांचे डेअरी फार्म बंद?

टॅग्स :बाजारशेतीशेतकरीदुष्काळउष्माघात