Join us

काय सांगताय...! मशरूम खाण्याने होताहेत इतके सारे फायदे; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 20:21 IST

Healthy Mushrooms : विविध आजारांवर रामबाण औषध असलेले, मशरुम बुरशीजन्य पीक आहे, हे वाळवीच्या वारुळातून, वाळवीने साठवलेल्या अन्नावर नैसर्गिकरित्या उगवत असते. वाळवीचे दोन प्रकार (काळी व गव्हाळ रंगाची) असल्याने, दोन प्रकारची मशरुम उगवते.

भारतात हजारो वर्षांपासून अनेक प्रकारच्या नैसर्गिक घटकांचा दैनंदिन आहारात वापर होत आला आहे. आहारातील विविधता ही भारतीय जीवनशैलीचा एक भाग आहे.

या प्रमाणेच आळींबीच्या वापरासंदर्भात देखील प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये विविध उल्लेख आढळतात. आळिंबी यांस मशरुम या नावाने सगळीकडे ओळख आहे. ग्रामीण भागात सात्या, डुंबरसात्या, केकोळ्या या नावांनी प्रसिद्ध आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आळींबीचा वापर होतो.

विविध आजारांवर रामबाण औषध असलेले, मशरुम बुरशीजन्य पीक आहे, हे वाळवीच्या वारुळातून, वाळवीने साठवलेल्या अन्नावर नैसर्गिकरित्या उगवत असते. वाळवीचे दोन प्रकार (काळी व गव्हाळ रंगाची) असल्याने, दोन प्रकारची मशरुम उगवते.

तसेच विविध झाडे व कुजक्या वनस्पतींवरही ही उगवत असते. लांब दांड्याची व बटन मशरूम असे दोन प्रकार पहावयास मिळतात. लांब दांड्याची मशरुम उष्ण प्रदेशात उगवते तर बटन मशरूम थंड प्रदेशात उगवते तर बटन मशरुम थंड प्रदेशात उगवते. 

परिपक्व १०० ग्रॅम आळिंबीमध्ये २६ कॅलरी उर्जा, स्टार्च ४.३ टक्के प्रथिने ३.९ टक्के मिळते. तसेच नाईसीन ॲसिड पॅन्टोथेनिक, ॲसिड एक सुंगधी अमीनो ॲसिड, थायमीन ॲसीड न्युक्लीक, ॲसीड सेलेनियम, कॉपर झिंक कॅल्शियम, मॅग्नेशियम पोटॅशियम, फॉस्फरस, अशी शरीराला आवश्यक असणारी नैसर्गिक खनिजे असतात. 

आळिंबीमध्ये ॲटी ॲलर्जिक कोलेस्टेरॉल, अँटीट्युमर, ॲन्टीकॅन्सर, अँटीबॅक्टेरिल, ॲन्टीव्हायरल, ॲन्टीइन्लॅमेटरी, ॲन्टीहायपरटेन्शन, हिपॅटोप्रोटेटिक्टव, ॲन्टी ॲन्थास्केलेरोसीस, ॲन्टीडायबेटिक, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे व पचनशक्ती वाढविणारे तत्व आहेत.

हेही वाचा : Food Processing : आरोग्यदायी अन् पौष्टिक 'कोदो मिलेट'ची चकली; मिलेट प्रक्रिया उद्योगातील आधुनिक संधी

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यशेती क्षेत्रभाज्याशेती