खरीप हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांनी सुधारित पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे खूपच कमी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.
अशा स्थितीत सरकारनेपीक विमा योजनेत सहभागाची तारीख वाढवून १४ ऑगस्ट केली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना सहभाग नोंदविण्यासाठी आवाहन केले आहे.
सरकारने २०२२ पासून राबविलेल्या पीक विमा योजनेत बदल करीत सुधारित पीक विमा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्पादनावर आधारित आणि ८०:११० या मॉडेलचा अवलंब करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून दिल्या होत्या.
या योजनेची अंतिम मुदत ही ३१ जुलैपर्यंत होती. मात्र, या योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले.
या सुधारित पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी अतिशय कमी सहभाग नोंदविला. त्यामुळे या योजनेची मुदत वाढविण्यात आली असून, आता १४ ऑगस्टपर्यंत सहभाग नोंदविता येणार आहे.
शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबीमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, म्हणून आता पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत विमा अर्ज नोंदवून घ्यावेत.
पीक विमा काढून घ्यावा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित करणे गरजेचे आहे. तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा काढून घ्यावे.
ई-पीक पाहणी बंधनकारक◼️ या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई-पीक पाहणी बंधनकारक आहे.◼️ अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात.◼️ कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे.◼️ ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त नोंदणी क्रमांक आणि ई-पीक पाहणी केली जाईल.
अधिक वाचा: E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?