lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > वयाची ६५ पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाची अभिनव योजना

वयाची ६५ पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाची अभिनव योजना

vyoshri yojana, Government's scheme for farmers who complete 65 years of age | वयाची ६५ पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाची अभिनव योजना

वयाची ६५ पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाची अभिनव योजना

ज्येष्ठ व वयोवृद्ध शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने अभिनव योजना सुरू केली असून तिचा लाभ राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांना होणार आहे.

ज्येष्ठ व वयोवृद्ध शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने अभिनव योजना सुरू केली असून तिचा लाभ राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांना होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.  किमान २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल.

यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे, तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल. याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल.

यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

या योजनेसाठी ४८० कोटी रुपयांच्या खर्चास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दिड कोटींच्या दरम्यान आहे. त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पिडीत सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल. केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते. मात्र ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल.

Web Title: vyoshri yojana, Government's scheme for farmers who complete 65 years of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.