Pune : ऊस उत्पादनात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी, साखर कारखाने आणि साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मार्फत पुरस्कार देण्यात येतात. तर यंदाचे म्हणजेच २०२४-२५ या आर्थिक वर्षातील विविध राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय पुरस्कारांची घोषणा आज (ता. २४) करण्यात आली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटट्युटचे महासंचालक संभाजी कडूपाटील यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली असून २९ डिसेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
दरम्यान, व्हीएसआयच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असून यंदाची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा २९ डिसेंबर रोजी मांजरी येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित राहणार आहेत.
व्हीएसआयकडून राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय पुरस्कार देण्यात येतात. राज्यस्तरीय 'ऊसभूषण' पुरस्कारामध्ये पूर्व हंगामात हेक्टरी २९८.२१ टन उत्पादन घेतल्याबद्दल माढा (सोलापूर) तालुक्यातील उपळवटे येथील नितीन काळे यांना कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहिर झाला आहे. एक लाख रूपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर सांगलीतील पलूस तालुक्यातील बांबवडे येथील अनिल लाड यांनी सुरू हंगामात हेक्टरी २५७.०९ टन उत्पादन घेतल्याबद्दल त्यांना कै. वसंतराव नाईक पुरस्कार जाहिर झाला आहे. एक लाख रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
खोडवा हंगामात वाळवा तालुक्यातील (सांगली) हुबाळवाडी येथील प्रदीप नांगरे यांनी हेक्टरी २५० टन उत्पादन घेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांना कै. आण्णासाहेब शिंदे पुरस्कार जाहीर झाला असून एक लाख रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यासोबतच सर्वच क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्याला राज्यस्तरावर कै. वसंतदादा पाटील यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. तर यंदा कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार बारामतीतील सोमेश्वरनगर (पुणे) येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रूपये रोख, मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे आहे.
विभागवार जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन काढणारे शेतकरी : पुरस्काराचे स्वरूप - स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक
विभाग - हंगाम - शेतकरी
दक्षिण विभाग - पूर्व हंगामात पहिला - अनिल कुमार खोत (कर्नुर, कोल्हापूर)
दक्षिण विभाग - खोडवा हंगामात पहिला - विनायक साळुंके (खेरडे- विटा, सांगली)
मध्य विभाग - पूर्व हंगामात पहिला -- शुक्राचार्य गवळी (भाळवणी, सोलापूर)
मध्य विभाग - सुरू हंगामात पहिला -- भूषण दत्तात्रय पाटील (लाखगाव, आंबेगाव)
मध्य विभाग - खोडवा हंगामात पहिला -- अनभुले प्रभाकर (ढवळस, सोलापूर)
उत्तर पूर्व विभाग - पूर्व हंगामात पहिला -- हनुमंत आगले (अकोला, बीड)
उत्तर पूर्व विभाग - खोडवा हंगामात पहिला -- अनिरूद्ध काळे (घुंगुर्डे हादगाव, जालना)
वैयक्तिक पुरस्कार (रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
पुरस्काराचे नाव - अधिकारी नाव - कारखाना
- सर्वोत्कष्ट पर्यावरण अधिकारी - मनोज नाईकवाडी - श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे
- सर्वोत्कष्ट आसवणी व्यवस्थापक - विक्रम म्हसवडे - जयवंत शुगर लि. सातारा
- सर्वोत्कष्ट फायनान्स मॅनेजर - भूषण नंद्रे - द्वारकाधीश साखर कारखाना, नाशिक
- सर्वोत्कष्ट शेतकी अधिकारी - सुजयकुमार तानाजी पाटील - राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, सांगली
- सर्वोत्कष्ट चीफ केमिस्ट - सुरेश धायगुडे - अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा
- सर्वोत्कष्ट चीफ इंजिनिअर - अशोक मुटकुळे - सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, नगर
- सर्वोत्कष्ट कार्यकारी संचालक (विभागून) - शहाजी गायकवाड - दौंड शुगर, पुणे व भास्कर घुले - श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे
- संस्थेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेले कर्मचारी - अण्णासाहेब कोटकर, डॉ. क्रांती निगडे, पोपटराव काटकर
विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार (पुरस्काराचे स्वरूप - मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभाग - पुरस्कार - कारखान्याचे नाव
दक्षिण विभाग
- प्रथम - जयवंत शुगर्स लि.सातारा
- द्वितीय (विभागून) - पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवाडी हुमात्मा किसन अधिर सहकारी साखर कारखाना, सांगली आणि दालमिया भारत शुगर अॅण्ड इंडस्ट्रिज लि. सांगली.
- तृतीय - श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
मध्य विभाग
- प्रथम - कर्मवीर शंकरराव काळे, अहिल्यानगर
- द्वितीय - पराग अॅग्रो फुड्स अॅन्ड अलाईड प्रोडक्टस्, पुणे
- तृतीय (विभागून) - संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे आणि कर्मयोगी सुधारकरपंत परिचारक पाडुंरग सहकारी साखर कारखाना, सोलापूर
उत्तर पूर्व
- प्रथम - कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, जालना,
- द्वितीय - कुंटूरकर शुगर अॅन्ड अॅग्रो प्रा. लि. नांदेड
- तृतीय - जय भवानी सहकारी कारखाना, बीड
सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार : (पुरस्काराचे स्वरूप - मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
विभाग - कारखान्याचे नाव
- दक्षिण विभाग - विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना, चिखली - सांगली,
- मध्य विभाग - दौंड शुगर, आलेगाव- पुणे
सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार : (पुरस्काराचे स्वरूप - मानचिन्ह व प्रशस्तिपत्र)
- दक्षिण विभाग - राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, वाटेगाव- सांगली
- मध्य विभाग - श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, श्रीनाथनगर- पुणे
- उत्तरपूर्व विभाग - छत्रपती सहकारी साखर कारखाना, सोनाजीनगर- बीड
पुरस्कार
- कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार ( रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) - श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, द्त्तनगर, कोल्हापूर
- कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार ( रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) - नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रिज, साईनगर- धाराशिव,
- कै. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार (रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) - अंजिक्यतारा सहकारी साखर कारखाना, शाहूनगर- शेंद्र, सातारा
- कै. रावसाहेब पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार ( रोख एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) - राजारामबापु पाटील सहकारी साखर कारखाना, राजारामनगर, सांगली
- कै. राजे विक्रमसिंह घाटगे सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार - विभागून ( रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) -- विलास सहकारी साखर कारखाना, तोंडार, लातूर, वेकटेशकृपा शुगर मिल्स लि. जातेगाव, पुणे
- कै. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार - विभागून ( रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) -- डॉ़. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, वांगी, सांगली, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, शिवनगर, सातारा.
