Join us

उत्तम प्रतीच्या निर्यातक्षम फळ उत्पादनासाठी वेल बांधणी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 18:37 IST

वेलवर्गीय भाजीपाला किंवा फळपिकाचे उत्पादन घेत असताना वेलेची बांधणी करणे गरजेचे असते.

वेलवर्गीय भाजीपाला किंवा फळपिकाचे उत्पादन घेत असताना वेलेची बांधणी करणे गरजेचे असते. असे केल्यास दर्जेदार उत्पन्न घेण्यास मदत होते. फळपिकांची किंवा फळभाज्यांची जसे की, खरबूज, टरबूज, काकडी, दोडका, कारले, टोमॅटो यांची वेल बांधणी केल्यास फळाचा जमिनीशी संपर्क येत नाही. त्यामुळे प्रत चांगली राहण्यास मदत होते.

निर्यातक्षम फळांचे उत्पादन घेण्यासाठी वेल बांधणी हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. अनेक शेतकरी वेल न बांधता जमिनीवर फळांचे उत्पादन घेतात. अशावेळी फळांचा जमिनीशी संपर्क येतो आणि फळे खराब होण्याची शक्यता असते. तर फळांना डाग पडणे किंवा त्यांच्यावर रोगरोई येण्याची दाट शक्यता असते. तुलनेत जर शेतकऱ्यांनी वेल बांधणी केली तर फळांचा जमिनीशी संपर्क येत नाही. 

दरम्यान, वेलबांधणी ही जास्त खर्चिक संकल्पना नसल्यामुळे शेतकऱ्यांना ती परवडते. पॉलिहाऊस किंवा ग्रीनहाऊसमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती अधिक सोपी व फायदेशीर ठरते. कारण संरक्षित शेती पद्धतीमध्ये हवामानावर कंट्रोल करता येतो. 

वेल बांधणी केल्यानंतर एका झाडाला जास्त वजनाचे एक किंवा दोन फळे ठेवता येतात. खरबुजासारखे फळ असेल तर दोन फळे ठेवता येतात. यामुळे शेतातील सर्व फळांचा आकार आणि प्रत समान राहण्यास मदत होते. निर्यातीसाठी प्रत आणि आकार दोन्ही महत्त्वाचे असतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीभाज्याफळे