व्ही. एस. कुलकर्णी
उदगीर : राज्यातील २८४१ पशुवैद्यकीय श्रेणी-२ दवाखान्यांचे पशुवैद्यकीय श्रेणी-१ दवाखान्यामध्ये श्रेणी वाढ करून, सद्य: स्थितीत कार्यरत असलेल्या १७४५ पशुवैद्यकीय श्रेणी-१ दवाखाने व श्रेणी वाढ करण्यात येत असलेल्या २८४१ अशा एकूण ४५८६ पशुवैद्यकीय संस्थांचे नामकरण पशुवैद्यकीय चिकित्सालयVeterinary Clinic असे करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या पुनर्रचनेत उदगीर तालुक्यातील ९ पशू प्रथमोपचार केंद्रे बंद करून दोन नवीन दवाखाने सुरू करण्याचा प्रस्ताव दिलेला असताना राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाने ही ९ दवाखाने कायम ठेवून त्यांचे नामकरण पशुवैद्यकीय चिकित्सालय करण्यास मान्यता दिली आहे.
पशुसंवर्धन विभागाची वाटचाल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायामध्ये उद्योजकता निर्माण करण्याकडे होत आहे. २१ व्या शतकातील शेतकरी, पशुपालक व दुग्ध व्यवसायिक यांच्यासमोरील आव्हाने लक्षात घेता पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची वाटचाल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उद्योजकतेच्या दिशेने होणे अपेक्षित आहे.
या विभागाचा मूळ उद्देश हा पशुपालनामधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे व त्याद्वारे त्यांची आर्थिक उन्नती साधने हा आहे. पशुसंवर्धन क्षेत्रातील बदलती आव्हाने विचारात घेऊन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे एकत्रीकरण करून कार्यालयीन पुनर्रचना शासनाने करण्यास १० ऑक्टोबर २४ रोजी मान्यता दिली आहे.
राज्यातील २५१ तालुक्यांमध्ये तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील २८४१ पशुवैद्यकीय श्रेणी-२ दवाखान्यांचे पशुवैद्यकीय श्रेणी-१ दवाखान्यांमध्ये श्रेणीवाढ करण्यास मान्यता दिली आहे.
सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या १७४५ पशुवैद्यकीय श्रेणी-१ दवाखाने श्रेणीवाढ करण्यात येत असलेल्या २८४१ अशा एकूण ४५८६ पशुवैद्यकीय संस्थांचे नामकरण पशुवैद्यकीय चिकित्सालय करण्यास जाहीर करण्यात आले आहे.
दोन नवीन चिकित्सालय सुरू करण्याचा प्रस्ताव...
• उदगीर तालुक्यातील तोगरी, सुकणी, किनी यल्लादेवी, कल्लूर, रावणगाव, कौळखेड, नेत्रगाव, शेल्हाळ, अवलकोंडा ही पशुवैद्यकीय दवाखाने बंद करून नवीन सताळा बु. व धडकनाळ येथे सुरू करण्याचा प्रस्ताव उदगीर येथील पशुधन विकास अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला.
• राज्य शासनाने काढलेल्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतिबंधाच्या १० ऑक्टोबर २४ च्या शासन निर्णयात बंद करण्यासाठी पाठविलेल्या ९ दवाखान्यांचे नामकरण पशुवैद्यकीय चिकित्सालय करण्याचे आदेश उदगीर तालुक्यातील क्र. ३५०६ ते ३५३० दिले आहेत.
आता पशुवैद्यकीय चिकित्सालय
उदगीरसह, देवर्जन, वाढवणा बु., हंडरगुळी, दावणगाव या मोठ्या दवाखान्यांसह एकुरंगा रोड, किनी यल्लादेवी, रावणगाव, कासराळ, गुडसुर, हेर, नळगीर नागलगाव आदी २५ दवाखाने पशुवैद्यकीय चिकित्सालय या नावाने ओळखली जाणार आहेत. या शासन निर्णयात सताळा बु. व धडकनाळ येथील पशुचिकित्सालय सुरू करण्यासाठी कोणताही निर्णय झालेला नाही.
Animal Husbandry : पशुसंवर्धनाच्या पुनर्रचनेचा काय होणार परिणाम वाचा सविस्तर