टिशू कल्चर पद्धतीने तयार केलेल्या रोपांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे आयकर कायद्याच्या कलम १० (१) अंतर्गत करमुक्त कृषी उत्पन्न असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
टिशू कल्चर उद्योगासाठी दिलासादायक ठरणारा ऐतिहासिक निकाल तेलंगणा उच्च न्यायालयाने दिला आहे.
याबाबत ए जी बायोटेक लॅबोरेटरीज इंडिया लिमिटेड या कंपनीने न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती. यामुळे रोपांच्या किमतीत होणारी सुमारे ३० टक्के दरवाढ टळली आहे.
न्यायालयाने नमूद केले प्रयोग शाळेतील टिशू कल्चर प्रक्रिया ही पारंपरिक रोपनिर्मितीची आधुनिक पद्धत असून ती कृषी स्वरूप बदलत नाही.
जर टिशू कल्चर उत्पन्नावर आयकर लागू झाला असता, तर रोपांच्या किमती किमान ३० टक्क्यांनी वाढल्या असत्या. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात दर्जेदार व रोगमुक्त रोपे उपलब्ध होणार असून शेती उत्पादन खर्च नियंत्रणात राहणार आहे. - विश्वास चव्हाण, सीमा बायोटेक
जुन्या आयकर कायद्यात 'नर्सरी' या शब्दापुरतीच मर्यादा असल्याने टिशू कल्चर उद्योगावर अनेकदा कर लावण्याचे प्रयत्न झाले. मात्र नव्या आयकर विधेयकात 'सिडलिंग' व 'सॅपलिंग'चा समावेश केल्यामुळे आता टिशू कल्चर कंपन्यांना कर सवलतीचा लाभ मिळेल. - अक्षय पाटील, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ प्लांट टिशू कल्चर इंडस्ट्रीज
अधिक वाचा: शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी 'हा' कारखाना देणार उसाला सरसकट १०० रुपये अनुदान
