Join us

अमेरिकेचे अन्न व औषध निरीक्षक भारतात दाखल; आजपासून आंबा निर्यात कार्यवाही सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 10:48 IST

Mango Export from Maharashtra आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

Amba Niryat ३ एप्रिलपासून अमेरिकेला निर्यात सुरू होणार असून ऑस्ट्रेलिया, जपानसह यावर्षीपासून अर्जेंटिनालाही आंबा निर्यात केला जाणार आहे.

यावर्षीपासून पणन मंडळ हे गुजरात, कर्नाटक, केरळसह उत्तर प्रदेशमधील निर्यातदारांनाही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. भारतीय आंब्याला जगभरातून मागणी वाढत आहे.

अमेरिका, ऑस्ट्रेलियाला निर्यात करताना विकिरण प्रक्रिया व युरोपीयन देशांसह न्यूझीलंडसारख्या देशात आंबा निर्यात करताना व्हीएचटी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने यासाठी नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक विकिरण प्रक्रिया केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये जागतिक मानांकनाप्रमाणे आंब्यावर निर्जतुकीकरण प्रक्रिया केली जात आहे. या वर्षासाठी चार हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

३ एप्रिलला कंटेनर जाणारअमेरिकन निरीक्षक १ एप्रिलला दाखल होणार असून, आंब्याची डोज मॅपिंग सुरू करणार आहेत. त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर ३ एप्रिलला पहिला कंटेनर पाठविला जाणार आहे. गतवर्षी मलेशियालाही आंबा निर्यात केला होता. यावर्षी मलेशियासोबत अर्जेंटिनाला आंबा निर्यात केला जाणार आहे.

आंबा निर्यातीचा तपशीलदेश - निर्यात (टन)जपान - ३५.११०न्यूझीलंड - ९९.३३९दक्षिण कोरिया - ४.६९७युरोपियन देश - १२.२५२अमेरिका - १८३ऑस्ट्रेलिया - ४.०५७

यंदा निर्यातदारांची संख्या जाणार १०० वरपणन मंडळाच्या विकिरण केंद्रातून गतवर्षी जवळपास ७५ निर्यातदारांनी आंबा निर्यात केला होता. यावर्षी ही संख्या १००च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. यावर्षी मध्य प्रदेशमधील २, गुजरातमधील ४ व दक्षिणेकडील राज्यांतून ४ निर्यातदारांनी नोंदणी केली आहे. पणन मंडळ आता राज्यातील निर्यातदारांबरोबर देशातील चार राज्यांनाही आंबा निर्यातीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

व्हीएचपी प्रक्रिया करून आंबा निर्यातआयएफसी-अमेरिका, ऑस्ट्रेलियाला आंबा निर्यात करताना आयएफसी तंत्राद्वारे तीन मिनिटांची व्हॉट वॉटर ट्रीटमेंट व रेडिएशन ट्रीटमेंट केली जाते. व्हीएचटी प्रक्रिया-युरोपियन व इतर काही देशांसाठी ही प्रक्रिया आवश्यक असते. यामध्ये एक तासाची व्हॉट वॉटर ट्रीटमेंट करून आंबा निर्यात केला जातो. काही देशांसाठी व्हीएचपी प्रक्रिया करून आंबा निर्यात केला जातो.

आजपासून डोजमॅपिंग सुरूअमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक भारतात दाखल झाले आहेत. पणन विभागाच्या नवी मुंबई केंद्रात येणार आहेत. याठिकाणी आजपासून ऑडीट व डोजमॅपींगची प्रक्रिया सुरू करणार आहे.

आंबा प्रकारानिहाय झालेली निर्यातप्रकार - निर्यात (टन)हापूस - ७०.२५४केशर - १९२.८०३बेगनपल्ली - ४५.९६तोतापुरी - ०.८५७लंगडा - ७.७६२चौसा - ३.४९७मल्लिका - १.४८२नीलम - ०.३४६हिमायत - २.१५राजापुरी - ३.२४८दशेरी - ३.७०७रसालू - ०.२८७

अधिक वाचा: आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम; शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनवी मुंबईअमेरिकाअमेरिकाआॅस्ट्रेलियाबाजारमार्केट यार्डमध्य प्रदेशगुजरात