Join us

रब्बी हंगामासाठी 'या' खतांवर एनबीएस आधारित अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 09:37 IST

Fertilizer NBS Subsidy पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८,००० कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८,००० कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली.

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम २०२५-२६ (०१.१०.२०२५ ते ३१.०३.२०२६ पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅश (पी अँड के) खतांवर पोषक तत्व आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

रब्बी हंगाम २०२५-२६ साठी अंदाजे ३७,९५२.२९ कोटी रुपयांची आवश्‍यकता असून ती २०२५ मधील खरीप हंगामाच्या अर्थसंकल्पीय गरजेपेक्षा ७३६ कोटी रुपयांनी जास्त आहे.

रब्बी २०२५-२६ (०१.१०.२०२५ ते ३१.०३.२०२६ पर्यंत लागू) साठी मंजूर दरांवर आधारित डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि एनपीकेएस (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर) ग्रेडसह पी अँड के खतांवर अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत खतांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. खतांच्या आणि कच्चा माल यांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलिकडचा कल लक्षात घेवून पी अँड के खतांवरील अनुदानाचे सुसूत्रीकरण केले आहे.

अधिक वाचा: Montha Cyclone : मोंथा चक्रीवादळ राज्यात कुठे धडकणार? पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट

English
हिंदी सारांश
Web Title : Cabinet approves NBS subsidy for Rabi season fertilizers.

Web Summary : The Cabinet approved ₹38,000 crore subsidy for Rabi fertilizers. The subsidy on P&K fertilizers, including DAP, will ensure affordable prices for farmers. This exceeds the 2025 Kharif budget by ₹736 crore.
टॅग्स :खतेशेतीशेतकरीपीकरब्बीखरीपकेंद्र सरकारसरकारशिवराज सिंह चौहाननरेंद्र मोदी