Umed Abhiyan : महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ आपल्या कुटुंबासोबतच समाजाचे आर्थिक सक्षमीकरण साधले आहे. राज्य व केंद्र सरकारने बचत गटासाठी विविध विकास योजना आखल्या आहेत. (Umed Abhiyan)
नागपूर येथील जिल्हा परिषदेने बचतगटांसाठी एक पायलट प्रोजेक्ट राबविणार आहे. जिल्हा परिषदेच्या 'उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान' अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसाहाय्यता समूहांच्या ग्रामीण उद्योगांनी आधुनिकतेची कास धरून यश संपादन केले आहे. (Umed Abhiyan)
या बचतगटांनी केवळ राज्यातच नव्हे तर देशाबाहेरही आपल्या उत्पादनांची विक्री केली करून यावर्षी जवळपास साडेचार कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
स्वयंसाहाय्यता समूहांद्वारे बनविण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये सुती व फॅन्सी कपडे, लाखी बांगड्या, महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने, वारली चित्रकला, बांबू व काष्ठशिल्प, स्वच्छता व आरोग्य उत्पादने आणि अन्नधान्य यांचा समावेश आहे. या उत्पादनांना शासनाकडून मानांकन प्राप्त झाले असून, त्यामुळे या गटांना बाजारपेठेत स्थान मिळाले आहे. (Umed Abhiyan)
सध्या जिल्ह्यात १,५०० हून अधिक महिला बचतगट कार्यरत असून, त्यातील ३५ गटांनी ई-कॉमर्स (E-Commerce) प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर सुरू केला आहे.
ई-कॉमर्स वेबसाईटवर उत्पादनांची विक्री
* 'उमेद मार्ट' या स्वयंस्थापित ऑनलाइन प्लॅटफॉर्मबरोबरच ॲमेझॉन, इंडिया मार्ट व मेशोसारख्या राष्ट्रीय ई-कॉमर्स (E-Commerce) कंपन्यांवरही उत्पादनांची विक्री सुरू आहे. ग्राहकांच्या दारात उत्पादन पोहोचविण्याची क्षमता या गटांनी विकसित केली आहे.
* महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ आपल्या कुटुंबासोबतच समाजाचे आर्थिक सक्षमीकरण साधले आहे. या यशस्वी वाटचालीमागे जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी यांची मदत मिळत आहे. त्यांनी बचतगटांसाठी हक्काचा मॉल उभारण्याचा संकल्प केला आहे.
* 'पायलट प्रोजेक्ट'च्या माध्यमातून बचतगटांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर यांनीही बचतगटांना प्रोत्साहन दिले आहे.
सरसमुळे विक्रीची संधी
महालक्ष्मी सरस महोत्सव, दिल्ली सरस, पुणे सरस, नोएडा सरस आणि अन्य विभागीय व जिल्हास्तरीय प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधीही या महिलांना मिळाली. तात्पुरती तसेच कायमस्वरूपी विक्री केंद्रे आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्री करून या उद्योगांना अधिक चालना मिळाली आहे.