Lokmat Agro >शेतशिवार > ११४ गावांमध्ये होणार दोन वेळा ई-पीक पाहणी

११४ गावांमध्ये होणार दोन वेळा ई-पीक पाहणी

Two times e-peak pahani crop inspection will be done in 114 villages | ११४ गावांमध्ये होणार दोन वेळा ई-पीक पाहणी

११४ गावांमध्ये होणार दोन वेळा ई-पीक पाहणी

डिजिटल क्रॉप सर्वेनुसार सुरू असलेल्या राज्यातील ११४ गावांमधील प्रायोगिक तत्त्वावरील ई-पीक पाहण्याची मुदत मात्र, दहा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. ही मुदत आता २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.

डिजिटल क्रॉप सर्वेनुसार सुरू असलेल्या राज्यातील ११४ गावांमधील प्रायोगिक तत्त्वावरील ई-पीक पाहण्याची मुदत मात्र, दहा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. ही मुदत आता २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सध्या मोबाइलद्वारे सुरू असलेल्या ई पीक पाहणीची मुदत १५ ऑक्टोबर असून डिजिटल क्रॉप सर्वेनुसार सुरू असलेल्या राज्यातील ११४ गावांमधील प्रायोगिक तत्त्वावरील ई-पीक पाहण्याची मुदत मात्र, दहा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. ही मुदत आता २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. नियमित ई-पीक पाहणीची मुदत तीच असल्याने शेतकऱ्यांनी या वेळेत पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५७ लाख ६ हजार ४९४ खातेदारांनी ७९ लाख २५ हजार ४९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नोंदणी केली आहे.

कुठे होणार दोन वेळा ई-पीक पाहणी 
डिजिटल क्रॉप सर्व्हे या मोबाइल अॅपवरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे व नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सर्व गावे अशा ११४ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावरील ई-पीक पाहणी केली जात आहे. या ११४ गावांमध्ये दोन वेळा ई-पीक पाहणी होणार आहे.

खरीप हंगामातील नोंद झालेली प्रथम पाच पिके
- सोयाबीन: २९ लाख १४ हजार २१६ हेक्टर
- कापूस: १५ लाख ६७ हजार ८०१ हेक्टर
- भात: ७ लाख ६६ हजार ४९ हेक्टर
- तूर: ३ लाख ३६ हजार ८७५ हेक्टर
- मका: ३ लाख १८ हजार ११६ हेक्टर

१५ सप्टेंबरअखेर ई-पीक पाहणीची स्थिती
- पीक पाहणी खातेदार संख्या: ५७ लाख ६ हजार ४९४
- क्षेत्र: ७९ लाख २५ हजार ४९२ हेक्टर

Web Title: Two times e-peak pahani crop inspection will be done in 114 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.