कबनूर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट ऑफ श्री रेणुका शुगर्स प्रशासनाने चालू यावर्षी गळितास येणाऱ्या उसासाठी प्रतिमेट्रिक टन ३६१८ रुपये दर देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
त्यापैकी पहिली उचल एफआरपी एकरकमी प्रतिमेट्रिक टन ३५१८ रुपयांप्रमाणे विनाकपात अदा करण्यात येईल. उर्वरित १०० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम गळीत हंगाम संपल्यानंतर अदा करणेत येईल, अशी माहिती रेणुका शुगर्स प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
चालू गळीत हंगामाचा कालावधी कमी असल्याने सर्व सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवावा, असे आवाहनही केले आहे.
त्याचबरोबर हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन एफआरपी ३३१८ रुपये व अतिरिक्त २०० असा ३५१८ रुपये दर जाहीर केला.
गाळपानंतर १४ दिवसांत ३४०० रुपये व हंगामानंतर उर्वरित ११८ रुपये देण्याचे निश्चित केल्याची माहिती संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी दिली.
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, हंगामाच्या तोंडावर संघर्ष टाळण्यासाठी कारखानदार व शेतकरी संघटनांनी घेतलेली समजुतीची भूमिका स्वागतार्ह आहे.
आता ऊस वाहतुकीसाठी अडचण नाही. धुराडी पेटूनसुद्धा ऊस वाहतूक रोखल्याने कारखाना चालविण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती.
ऊस दराच्या मुद्द्यावर संघटना व कारखानदारांत एकमत झाले ही आनंदाची बाब आहे. संघर्षाची धग वाढू नये, यासाठी आम्हीही एक पाऊल पुढे टाकले आहे. सभासदांनी सर्व ऊस या कारखान्याला पाठवून सहकार्य करावे.
अधिक वाचा: पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची नव्याने बैठक; एकरी किमान सात ते आठ कोटीची मागणी
Web Summary : कोल्हापुर की दो चीनी मिलों ने गन्ने की दरों में संशोधन की घोषणा की। पंचगंगा मिल ₹3618/टन, ₹3518 अग्रिम देगी। जवाहर मिल ₹3518/टन (₹3318 + ₹200) देगी। किसानों से गन्ना आपूर्ति करने का आग्रह किया गया, परिवहन मुद्दे हल हुए।
Web Summary : कोल्हापूर साखर कारखान्यांकडून ऊस दरात वाढ; शेतकऱ्यांना दिलासा