सुशिक्षित बेरोजगार तथा शेतकरी तरुण युवक-युवती व महिला बचत गटाच्या सभासदांसाठी कृषी विज्ञान केंद्र, गांधेली छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि.०२) फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षण दरम्यान शेळीपालन, कुक्कुटपालन, रोपवाटिका व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती आदी घटकांवर प्रशिक्षणे देण्यात येणार आहे.
तसेच शेळीपालन, कुक्कुटपालन, रोपवाटिका व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षणार्थींना बँकेच्या कर्जाकरिता प्रमाणपत्र व प्रकल्प अहवाल देखील कृषी विज्ञान केंद्राकडून तयार करून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी नोंदणीची अंतिम तारीख ३० जानेवारी २०२६ सायंकाळी पाच वाजेपर्यंत असून प्रति प्रशिक्षण वर्ग केवळ २० जागा असणार आहे.
या प्रशिक्षणासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ श्रीकांत खुपसे (मो. नं. ८६०५५३३३१५), शरद अवचट (मो. नं.९६६५४३०११८१) यांच्याशी किंवा कृषी विज्ञान केंद्र गांधीली, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा. असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात आले आहे. दरम्यान हे प्रशिक्षण निवासी नसून राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रशिक्षणार्थींनी स्वतः करायची आहे.
हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब
Web Summary : Krishi Vigyan Kendra, Chhatrapati Sambhajinagar, offers training in goat farming, poultry, nursery management, and vermicompost production for unemployed youth and women's self-help groups. The center will also provide project reports for bank loans. Registration closes January 30, 2026. Contact for details; accommodation is trainees' responsibility.
Web Summary : कृषि विज्ञान केंद्र, छत्रपति संभाजीनगर, बेरोजगार युवाओं और महिला स्वयं सहायता समूहों के लिए बकरी पालन, कुक्कुट पालन, नर्सरी प्रबंधन और वर्मीकम्पोस्ट उत्पादन में प्रशिक्षण प्रदान करता है। केंद्र बैंक ऋणों के लिए परियोजना रिपोर्ट भी प्रदान करेगा। पंजीकरण 30 जनवरी, 2026 को बंद हो जाएगा। विवरण के लिए संपर्क करें; आवास प्रशिक्षुओं की जिम्मेदारी है।