Join us

पारंपरिक पीकपद्धती खर्चिक त्यात उत्पन्न हाती लागेना; भातशेतीच्या आगारात कोणी लावतोय स्ट्रॉबेरी तर कोणी केळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 16:35 IST

केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेलबियावर्गीय सूर्यफूल व करडई या पिकांच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी क्लस्टर बेस नियोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने यंदा आंबेगाव तालुक्यात २०० हून अधिक शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी पिकाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कांताराम भवारी 

पुणे जिल्ह्यात केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेलबियावर्गीय सूर्यफूल व करडई या पिकांच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी क्लस्टर बेस नियोजन करण्यात येत आहे. आंबेगाव तालुक्यात केळी, आंबा व स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने यंदा आंबेगाव तालुक्यात २०० हून अधिक शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी पिकाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

याच पद्धतीने स्ट्रॉबेरी, अंजीर, आंबा आदींवरही लक्ष केंद्रित करण्यात यावे. प्रशिक्षणाची व्यवस्था आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्रांनी समन्तयाने करावी. तरी आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदर क्लस्टरमध्ये सहभागी होण्यासाठी गावातील कृषी सहायक किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

परदेशी बाजारपेठेत निर्यातीसाठी तेथील मागणी, कृषिमालाची दर्जा, गुणवत्ता यावर विशेष भर द्यायचा असून, त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यात सुविधा केंद्रांसाठी आवश्यक शीतकरण, निर्यातीसाठी प्रक्रिया केलेला कृषिमाल वाहतूक आदींच्या सुविधा निर्मितीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प तथा स्मार्ट, केंद्र शासनाचा कृषी पायाभूत सुविधा निधी, अशा विविध योजनांतून लाभ देण्यात येणार आहे.

फळपिकांच्या क्षेत्रात का होतेय वाढ?

पुणे जिल्ह्यात केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी आणि तेलबियावर्गीय सूर्यफूल व करडई या पिकांच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी क्लस्टर बेस नियोजन करण्यात येत आहे.

• यामध्ये उत्पादन वाढीसह प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वंकष आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

• सर्व सुविधांसाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करून जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी आंबेगाव तालुक्यातील केळी, आंबा व स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश करण्यात आला आहे.

आंबा पिकाचा समावेश

आंबेगाव तालुक्यात केळी, आंबा व स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने यंदा आंबेगाव तालुक्यात २०० हून अधिक शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी पिकाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पारंपरिक पीकपद्धती खर्चिक; अनिश्चिततेचाही धोका

• केळी पिकाचे जिल्ह्यात १ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, ते आगामी वर्षात ३ हजार हेक्टरपर्यंत नेण्याचे, तसेच प्रती हेक्टरी उत्पादनातही वाढ होण्याच्या दृष्टीने लक्ष्य ठेवावे.

• त्यासाठी केळी लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, त्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे, दर्जेदार रोपे पुरविणे, पाण्याची व्यवस्था, मातीचे आरोग्य, जैविक आधारित खते, औषधे आदी निविष्ठा, कृषी यांत्रिकीकरण तसेच पीकनिहाय उत्कृष्ट उत्पादन पद्धती, लागवडीपूर्वीची, पिकाच्या काढणीपूर्वीची आणि काढणीपश्चात प्रक्रिया आर्दीबाबतच्या तंत्र, योजनांची माहिती व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याबाबतचा लाभ कसा मिळेल आदींचा समावेश प्रशिक्षण सत्रामध्ये करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

स्ट्रॉबेरी पिकाच्या लागवडीसाठी २०० हून अधिक शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर यंदा स्ट्रॉबेरी लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भीमाशंकर परिसरातील वातावरण हे स्ट्रॉबेरी पिकाला अनुकूल असल्याने येथे स्ट्रॉबेरीचे पीक उत्तम प्रकारे रुजत आहे. या भागात चांगल्या प्रतीची स्ट्रॉबेरी निर्माण होत असल्याने ग्राहकांकडून स्ट्रॉबेरीची मागणी वाढत आहे. - प्रदीप देसाई, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव.

हेही वाचा :  जमिनीच्या गुणधर्मांची माहिती जाणून घेण्यासाठी शेतातील माती का अन् कशी तपासावी? वाचा काय सांगताहेत तज्ञ

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकबाजारफळेफलोत्पादनपुणे