Join us

पारंपरिक पर्यावरणपूरक आमरायांचे अस्तित्व हरवले; गावरान 'आंबा'ही होतोय दुर्मिळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 13:33 IST

Aamrai: कमी कालावधीत भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने पूर्वीच्या आमरायांचे अस्तित्व हळू हळू नष्ट होऊ लागले. पर्यावरणाला पोषक असलेली भलीमोठी गावरान आंब्यांची झाडे आता क्वचितच नजरेस पडतात.

पूर्वी प्रत्येक शेताच्या बांधावर आंब्याची झाडे हमखास असायची. दाटीवाटीने उभ्या असलेल्या झाडांना आमराई संबोधले जाई. जसजसे संशोधन होऊ लागले तसतसे आंब्यांच्या नवनवीन प्रजाती शेतात मूळ धरू लागल्या. कमी कालावधीत भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने पूर्वीच्या आमरायांचे अस्तित्व हळू हळू नष्ट होऊ लागले. पर्यावरणाला पोषक असलेली भलीमोठी गावरान आंब्यांची झाडे आता क्वचितच नजरेस पडतात.

सध्या सर्वत्र आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात हापूस, पायरी, केशर अशा जातींचे आंबे कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा भागांतून विक्रीसाठी नगरच्या बाजारात येत आहेत. स्थानिक परिसरातून अजून तरी आंब्यांची म्हणाती अशी आवक सुरू झालेली नाही. अलीकडील काळात शेतकरी आंब्यांच्या नव्या वाणाची व्यावसायिक तत्वावर शेतात लागवड करीत आहेत.

याचे कारण म्हणजे अल्पावधीत आंब्याचे उत्पन्न सुरू होते. आंबा फळाकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. मात्र पूर्वी असे नव्हते. शेतकरी शेताच्या बांधावर विविध रायतल जार्तीची आंब्याची झाडे लावीत असत. बांधातरची ही इझाडे उंच वाढत. दाटी वाटीने उभ्या असलेल्या झाडांना आमराई संबोधले जाई. शेतकरी उत्सवानिमित्त एकमेकांकडे जात.

त्यावेळी चांगल्या जातीची आंब्याची रोपे आवर्जून आणून शेताच्या बांधावर लावत. कलम हा प्रकार त्यावेळी नसे. जसजसे संशोधन होऊ लागले तसतसे आंब्यांच्या नवनवीन प्रजाती शेतात मूळ धरू लागल्या. कमी कालावधीत भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने पूर्वीच्या आमरायांचे अस्तित्व

हळू हळू नष्ट होऊ लागले आहे. अजूनही काही भागात आमराई आपले नामशेष होत असल्या तरी त्याविषयीच्या गोष्टी मोठचा रंजक आहेत. त्या आठवणीत मन रमले की, तो वैभवाचा काळ नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही. शाळेला सुट्टी लागली की, मुलांचा सगळा दिवस आमराईमध्ये जायचा. शेतात राबून क्कला भागलेला शेतकरी तिथेच विश्रांती घ्यायचा. तियेच त्याची न्याहारी व्हायची.

झाडावरच्या पक्ष्यांच्या चिवचिताटाने एक तेगलीच संगीत लकेर निर्माण व्हायची. दाट सातली, ताजे ताजे पाह. (पाह म्हणजे गाभुळलेला आंबा) खायला अगदीच गोड. आंब्याचे प्रकार तरी किती? गोटी आंबा, (चेंडुसारखा गोल), केशन्या आंबा (केसरी रंगाची साल असलेला), गोधळचा आंबा, (जाड सालीचा), दसऱ्या आंबा, (खूप दशी असलेला), साखऱ्या आंबा (साखरेसारखा गोड), खोबऱ्या आंबा (खोबऱ्याच्या चवीचा) असे नाना तन्हेचे आंबे खायला मिळायचे. सुरपारंब्या खेळायच्या, विहिरीत पोहायचे.

आमराईत बसून जेवताना हळद-मीठ लावून कैन्यांचा मनमुराद आस्वाद घ्यायचा. आंबे काढण्यासाठी एका सरळ सोट काठीला बास्केट बॉल खेळात असते तशी जाळी बांधलेली असे. त्या बांबूला खुडी म्हणत. झाडाच्या उंच सेंडचातर आऊन कैन्ऱ्या तोडणे हे काम खूप जिकिरीचे असे. उंचावरून फेकलेली फळे डोलणे यासाठीही कसब लागे. त्याला छोल्या म्हणत असत. हे काम बरेच दिवस चालायचे.

उंच झाडावरचे आंबे काढण्यात ठराविक लोकच पटाईत असायचे. भल्या पहाटे आमराईत लावून पाड तेचण्याची मजा तर काही औरच असायची. आता आमराई क्वचित कुठेतरी पाहायला मिळते. सगळीकडे संकरित वाणाची झाडे दिसत आहेत.

आंबे पिकवण्याची पद्धती बदलली आहे. विशिष्ट प्रक्रिया करून फळे पिकवली जात असल्याने कैन्यांची अळी लावणे हा प्रकार दिसेनासा झाला आहे. नतीन प्रजातीची झाडे खुली आहेत. त्यांचे लागवडीचे विशिष्ट प्रमाण आहे. त्यामुळे त्यांना आमराईचे वैभव मुळीच नाही,

पोपट धामणेराष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त

हेही वाचा : शेतकरी ताई कामाच्या ओघात स्वतःकडे दुर्लक्ष करू नको; 'या' कर्करोगाचे महिलांमध्ये प्रमाण वाढले

टॅग्स :आंबाशेतकरीशेती क्षेत्रशेतीफलोत्पादनबाजारपीक व्यवस्थापनफळे