घाटनांद्रे : उन्हाळी अवकाळी पाऊसच लांबल्याने रखडलेल्या पेरणीपूर्वी मशागती सध्या चारपाच दिवसांपासून होत असलेल्या अवकाळीमुळे आता पेरणीपूर्व मशागतींनी घाटमाथ्यावर चांगलाच वेग घेतला आहे.
सततच्या दुष्काळामुळे बैलांची संख्याच रोडावल्याने सध्या सर्रास ट्रॅक्टरद्वारेच मशागती केल्या जात आहेत. यावर्षी पाऊस वेळेअगोदर व समाधानकारक असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने सध्या बळीराजाच्या फिलगुडचे वातावरण आहे.
उन्हाळी पाऊसच लांबल्याने रखडलेल्या पेरणीपूर्वी मशागतींनीही आता अखेरच्या टप्प्यात पाऊस झाल्याने चांगलाच वेग घेतला आहे. त्यामुळे शिवार गजबजून गेली आहेत.
यामध्ये पालापाचोळा वेचणे, बांध बंदिस्त करणे, जमिनीची नांगरट, खुरपणी करणे, रोटर मारणे, नैसर्गिक खतांचा मात्रा देणे आदी कामे उरकून घेतली जात आहेत.
खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकर करावे, बी-बियाणे व खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र २१,३७४ हेक्टर इतके असून, त्यापैकी पेरणी क्षेत्र २०,१०६ हेक्टर इतके आहे. गतवर्षी पावसाविना खरीप हंगाम वाया गेला तर रब्बी हंगाम हा अवकाळी पावसामुळे कसाबसा तरला होता.
त्यामुळे बळीराजा अद्यापही अडचणी आला आहे. यावर्षी तरी खरीप हंगामात निसर्ग साथ देईल व खरीप हंगामातील पीक हाती येईल, या आशेवर बळीराजाने शेती मशागतीला चांगलीच सुरुवात केली आहे.
बैलजोडीने अनेक शेतकरी आपल्या शेताची मशागत करतात. मात्र, ज्यांच्याकडे बैलच नाहीत, त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागत आहे. यापेक्षा ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडेच कल वाढला आहे.
सध्याचे मशागतीचे दर पुढीलप्रमाणे (प्रतिएकर)नांगरट करणे३००० ते ३५०० रुपयेरोटर मारणे१६०० ते २००० रुपयेपंजा (फण) मारणे१२०० ते १५०० रुपये
अधिक वाचा: पिक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ करायची असेल तर करा या तंत्राने पेरणी