घनश्याम नवघडे
मोहफुलाचा हंगाम आता सुरू झाला आहे. मागील वर्षी या हंगामादरम्यान वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जंगलातील प्राण्यांची संख्या लक्षात घेता यंदाही दहशतीचे सावट आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, अशा सूचना वनविभागाने केल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड हा जंगलव्याप्त तालुका आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५१ हजार ६६०.४५ हेक्टर असून, यातील १४ हजार २९७.२५ हेक्टर क्षेत्र जंगलव्याप्त आहे. जंगलात तेंदू व मोहाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. वाघ आणि बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा अधिवास आहे.
दरम्यान आर्थिक आधार मिळवण्यासाठी संकटांशी सामना करून जंगलव्याप्त गावातील नागरिक मोहफुल व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जातात. मोहफूल व तेंदूपत्ता हा हंगाम प्रत्यक्ष जंगलाशी निगडीत असल्याने सावधगिरी बाळगूनच जंगलात जावे, अशा सूचना वनविभागाने केल्या आहेत.
तालुक्यातील गोविंदपूर परिसर, मौशी ढोरपा परिसर, बोंड, बाळापूर परिसर, कोसंबी गवळी परिसर, डोंगरगाव परिसर या परिसरातील अनेक गावे जंगलाने वेढलेली आहेत. या भागात वाघ किंवा बिबट्याचे दर्शन नेहमीच अनेकांना होत असते. या पार्श्वभूमीवर या हंगामात सावधगिरी बाळगूनच नागरिकांना जंगलात जावे लागणार आहे.
मोहफूल व तेंदू हंगामात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. एकट्याने जंगलात न जाता समुहाने जावे. सूर्योदयापूर्वी व सुर्यास्तानंतर जंगलात जाणे टाळावे. जंगलातील पाणवठ्याजवळ जाऊ नये. सरपंच, पोलिसपाटील यांनी नागरिक व वन विभागाशी समन्वय ठेवावा. - अरूप कन्नमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, तळोधी (बा.).
वाघांचा अधिवास असलेल्या वनक्षेत्रात प्रवेश टाळावा
• वाघांचा अधिवास असलेल्या वनक्षेत्रात प्रवेश टाळावा, संकलनासाठी केवळ नजीकच्या गावातील व्यक्तींनाच परवानगी द्यावी, सकाळी ८:०० वाजतापूर्वी जंगलात प्रवेश करू नये व संध्याकाळी पाच वाजतापूर्वीच जंगलातून बाहेर पडावे.
• प्राथमिक बचाव दल, कंत्राटदारांचे अग्निशमन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संकलन करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे, वाघाचा वावर आढळल्यास तत्काळ सतर्क करावे, संकलनादरम्यान पुरवण्यात आलेला मानवी मुखवटा डोक्याच्या मागील भागात लावावा.
• तसेच वाघाची चाहूल लागल्यास त्वरित मागे फिरावे व वनविभागाला माहिती द्यावी, अशा मार्गदर्शक सूचना वन विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
Web Summary : Wild animal attacks loom over the Mahua flower and Tendu leaf season in Chandrapur. Villagers are warned to be cautious when venturing into forests for collection, especially in tiger-prone areas. Travel in groups and avoid dawn/dusk hours.
Web Summary : चंद्रपुर में महुआ फूल और तेंदू पत्ता के मौसम पर जंगली जानवरों के हमले का खतरा मंडरा रहा है। ग्रामीणों को सलाह दी गई है कि वे संग्रह के लिए जंगलों में जाते समय सतर्क रहें, खासकर बाघ-प्रवण क्षेत्रों में। समूह में यात्रा करें और सुबह/शाम के घंटों से बचें।