Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने केले राज्यात सर्वाधिक उस गाळप; साखर उताऱ्यात कोण पुढे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 09:53 IST

sugarcane crushing season 2025-26 राज्यात कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी संपला आहे.

कोल्हापूर : राज्यात कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी संपला आहे. या कालावधीत राज्यातील १८४ खासगी साखर व सहकारी साखर कारखान्यांनी तीन कोटी ६७ लाख ९० हजार टनांचे गाळप केले आहे.

यामध्ये साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागच भारी ठरत असून, सरासरी ९.७५ टक्के उतारा सुरुवातीलाच कायम राखला आहे.

मात्र, गाळपात पुणे विभाग पुढे असून, त्यांनी ८६ लाख ७१ हजार टनांचे गाळप केले आहे. सर्वाधिक गाळप बारामती ॲग्रोचे असून, त्यांनी ९ लाख ४२ हजार टन ऊस गाळप केला आहे. 

किती क्विंटल साखर उत्पादन?◼️ यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हंगाम सुरू झाला.◼️ गेल्या दीड महिन्यात १८४ साखर कारखान्यांनी तीन कोटी ६७ लाख टन उसाचे गाळप करून तीन कोटी सात लाख ४६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.◼️ पुणे विभागात २९ साखर कारखाने आहेत, त्यांनी सर्वाधिक ८६ लाख ७१ हजार टनांचे गाळप केले आहे.◼️ त्या तुलनेत कोल्हापूर विभागात ३५ साखर कारखाने असूनही यंदा गाळपात मागे राहिला आहे.◼️ गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ डिसेंबर अखेर एक कोटी ६२ लाख टनाने गाळप अधिक झाले आहे.

गाळपात राज्यातील पहिले ५ साखर कारखाने१) बारामती ॲग्रो, पुणे - ९ लाख ४२ हजार.२) दौंड शुगर, पुणे - ७ लाख ८९ हजार.३) कल्लाप्पाण्णा आवाडे, हुपरी - ५ लाख ८९ हजार.४) तात्यासाहेब कोरे, वारणा - ५ लाख ५७ हजार.५) दत्त, शिरोळ - ४ लाख २५ हजार.

तुलनात्मक हंगाम (१५ डिसेंबर अखेर)हंगाम : २०२४-२५ : २०२५-२६सहकारी कारखाने : ९५ : ९१खासगी कारखाने : ९६ : ९३एकूण गाळप टन : २.५ कोटी : ३.६७ कोटीसरासरी उतारा : ८.०३% : ८.३६%

अधिक वाचा: ऊस दराच्या संघर्षाला यश; आता कारखान्याचा काटा कधी थांबवणार शेतकऱ्यांच्या घाटा?

English
हिंदी सारांश
Web Title : Pune District Leads in Sugarcane Crushing; Sugar Recovery Rates?

Web Summary : Maharashtra's sugar factories have crushed 36.79 million tonnes of sugarcane. Pune division leads in crushing with Baramati Agro topping the list. Kolhapur excels in sugar recovery at 9.75%. Overall sugar production reached 30.74 million quintals, exceeding last year's figures.
टॅग्स :साखर कारखानेऊसकोल्हापूरकाढणीबारामतीपुणे