मच्छिंद्र देशमुखकोतूळ : अकोले तालुक्यातील कोतूळपरिसरातील नाचणठाव जंगलात तब्बल अकरा किलो वजनाचा भुई कोहळा सापडला आहे.
आजपर्यंत इतका मोठा भुई कोहळा सापडल्याची नोंद नाही. अत्यंत दुर्मीळ आणि गुणकारी हा कंद आकर्षणाचा विषय आहे.
अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरातील नाचणठाव जंगलात शिवराम डोके यांना हा कंद मिळाला. या परिसरातील जंगलात दरवर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान हा कंद सापडतो.
याचा उपयोग जनावरांच्या दूध वाढ, भूक आणि जनावरे सशक्त करण्यासाठी केला जातो. दरवर्षी आदिवासी भागात लोक आपल्या जनावरांसाठी कच्चे कंद आंबवणातून देतात.
हा कंद मानवासाठीही अमृत कंद म्हणून ओळखला जातो. यकृत, शक्तिवर्धक म्हणून तो ओळखला जातो. मात्र, कामोत्तेजक म्हणून याची तस्करी केली जाते.
मात्र, स्थानिक जाणकार त्याची प्रक्रिया सांगत नसल्याने सहजासहजी हे औषध बनवता येत नाही. अकरा किलो वजनाचा कंद आजपर्यंत पाहिला नव्हता, असे शिवराम डोके सांगतात.
अशी आहेत नावेक्षिरविदारी कंद (संस्कृत) महाबटाटा, दूध भुई कोहळा. हा कंद मानवासाठीही अमृत कंद म्हणून ओळखला जातो.
स्थानिकांनी सांगितलेले औषधी गुणधर्म◼️ शक्तिवर्धक, स्त्रियांना बाळंतपणातील कमजोरीवर उपयुक्त, तापावर जलद गुणकारी, पशुधनासाठी अत्यंत उपयुक्त.◼️ विविध आजारांवर शक्तीवर्धक म्हणून हा कंद उपयोगी ठरतो.◼️ मद्यपानात कावीळ किंवा यकृत आजारावर गुणकारी असल्याचे शेतकरी सांगतात.
असा असतो कंदविटकरी रंग, आत पांढरा, गोडसर चव, तळहाताप्रमाणे पाच भागात विभागलेली पाने, झाडाझुडपांमध्ये हा वेल वाढतो. गुलाबी फुले, पायाखाली मंजिऱ्या.
अधिक वाचा: ३५ गुंठ्यांत 'या' शेतकऱ्याने घेतली तब्बल २६ प्रकारची पिकं; सहा महिन्यात पावणेचार लाखांचे उत्पन्न