कोल्हापूर : केंद्र पुरस्कृत PMFME Scheme प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यामध्ये ४१५ लक्षांक पैकी ४३२ प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून, ही योजना राबविण्यात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्व शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले. ही योजना सन २०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये राबविली जात आहे.
योजनेचा हेतू शेतमालावर प्रक्रिया करणारे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तसेच गट, शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयं साहाय्यता गट यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन बळकट करणे, नवीन सूक्ष्म उद्योग वाढवण्यासाठी प्रोत्साहन हा आहे.
योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खर्चाचे प्रमाण ६०:४० असे आहे. गत आर्थिक वर्षात ४३८ लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली. २६.५१ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले. सन २०२०-२०२१ पासून ९९८ प्रकल्प मंजूर असून, लाभार्थ्यांना ४१.८० कोटी रुपये अनुदान मिळाले.
प्रामुख्याने काजू, फळे व भाजीपाला प्रक्रिया, बेकरी दूध उत्पादने, मिरची, अन्नधान्य, मसाला उद्योग, पशुखाद्य निर्मिती प्रक्रिया, आदी प्रकल्पांचा समावेश आहे. तीन हजार ८०० कुशल, अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाला आहे.
असे उभारले प्रकल्पकाजू उत्पादने- १६७तृणधान्य उत्पादने- २०बेकरी प्रक्रिया उत्पादने-४८मसाले उत्पादने- ३८दुग्धजन्य पदार्थ उत्पादने- २९गूळ उत्पादने- १८पशुखाद्य उत्पादने- १०फळे व भाजीपाला प्रक्रिया उत्पादने- १०तेलबिया उत्पादने- ५सोयाबीन प्रक्रिया उत्पादने- २अन्य उत्पादने- ४
अधिक वाचा: ट्रॅक्टर का बैलजोडी, काय संभाळणं परवडतय? काय म्हणतायत शेतकरी? जाणून घ्या सविस्तर