सातारा : सातारा जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नावलौकिक कायम ठेवला आहे.
कारण, यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बँकेला १३०० कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असतानाही जूनअखेर १४३१ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.
यामुळे बँक खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाबरोबरच वसुलीतही राज्यात आघाडीवर आहे. Satara DCC Bank बँकेचा जिल्ह्याभर विस्तार झाला आहे.
बँकेने कृषी आणि कृषीपूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी, शेतकरी सभासदांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्नशील असते.
बँकेच्या संचालक मंडळाने शेती कर्जाच्या वसुलीसाठी केलेल्या आवाहनास तसेच विकास सेवा संस्था, सचिव, बँकेच्या वसुली यंत्रणेच्या विनंतीस प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील बळीराजाने प्रामाणिकपणे शेती कर्जाची वेळेत परतफेड केली.
याचाच परिणाम म्हणून बँकेने वसुलीची परंपरा कायम राखत यावर्षी शेती कर्जाची विक्रमी ९७.०७ टक्के वसुली करून राज्यात विक्रमही प्रस्थापित केला.
वसुली प्रोत्साहनासाठी व्याज परतावा योजना राबविणारी एकमेव बँक म्हणून सातारा जिल्हा बँकेचा उल्लेख केला जातो. शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड करून बँकेच्या व्याज परताव्याचा लाभ घ्यावा. - नितीन पाटील, अध्यक्ष, सातारा जिल्हा बँक
अधिक वाचा: सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रातच; कोणत्या बँकेचे किती कर्ज? जाणून घ्या सविस्तर