Join us

कोल्हापुर जिल्ह्यातील 'हे' दोन साखर कारखाने देणार ३४०० रुपयांनी पहिली उचल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:52 IST

दहा टक्के कामगार पगार वाढीसह या हंगामात पहिला हप्ता ३,४०० रुपये देऊन दुसऱ्या हप्त्यात एफआरपीप्रमाणे रक्कम देण्याची घोषणा केली आहे.

भोगावती कारखान्याला इथेनॉलच्या उभारणीसाठी दोनशे कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीबरोबरच पुढील निवडणुकीत राहुल पाटील आमदार असतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

दहा टक्के कामगार पगार वाढीसह या हंगामात पहिला हप्ता ३,४०० रुपये देऊन दुसऱ्या हप्त्यात एफआरपीप्रमाणे रक्कम देण्याची घोषणा अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी केली.

परिते येथील भोगावती साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभमारुतराव जाधव व सीमा जाधव यांच्या हस्ते केला. यावेळी ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, एफआरपीप्रमाणे रक्कम देत असताना सर्वच कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडते. यासाठी ४,३०० रुपये एमएसपी करण्याची मागणी सरकारकडे करीत आहोत.

कारखाना परिसरात अद्यावत केंद्राची उभारणी केली जाते. त्यातून उसावर पडणारे रोग, पाणी, खत, औषधे कधी द्यावे, याची माहिती मेसेजद्वारे दिली जाते.

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याची उचल प्रतिटनाला विनाकपात ३४०० रुपये देणार असल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

या हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले. बेलेवाडी काळम्मा येथे संताजी घोरपडे कारखान्याच्या १२व्या गळीत हंगामाचा प्रारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून झाला.

मुश्रीफ म्हणाले, कारखान्याची विस्तारवाढ करणार आहोत. परंतु, ऊस कुठून आणणार? कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त गाळप करणे हाच पर्याय आहे.

साखर कारखानदारी प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे. एफआरपी वाढते. परंतु, साखरेचा दर वाढत नाही. गळीत हंगाम १०० दिवस चालतो, हे कारखान्यांना परवडणारे नाही.

ए.आय.च्या जोरावर उत्पादन वाढविणेमंत्री मुश्रीफ म्हणाले, ए. आय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे ऊस उत्पादन एकरी सव्वाशे ते दीडशे टन होते. हे आता प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. ए.आय.च्या जोरावर एकरी उत्पादन वाढविणे हाच एकमेव पर्याय आहे. जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी प्रास्ताविक केले.

अधिक वाचा: आंदोलन अंकुशची एल्गार सभा झाली; चार हजाराच्या पहिल्या उचलीबरोबर अजून कोणते ठराव? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Two Sugar Factories Announce ₹3400 First Installment to Farmers

Web Summary : Bhogaavati and Santaji Ghorpade sugar factories in Kolhapur will provide ₹3400 as the first installment to sugarcane farmers. Minister Hasan Mushrif highlighted efforts to increase sugarcane production through AI and addressed the challenges faced by sugar factories due to rising FRP.
टॅग्स :साखर कारखानेऊसकोल्हापूरशेतीशेतकरीआर्टिफिशिअल इंटेलिजन्सहसन मुश्रीफ