Join us

राज्यातील 'या' तालुक्यांना मिळणार अतिवृष्टी व पूर आपत्तीच्या सवलती; तालुक्यांची सुधारित यादी आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 08:57 IST

purgrasta ativrushti savlat GR राज्यामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पिक/शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून, पशुहानी, मनुष्यहानी होणे, घर पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरीत करणे या बाबत मदत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत राज्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून त्यानुसार जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत २६.६९ लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेंबर २०२५ या महिन्यात जवळ-जवळ ३९ लाख हेक्टर क्षेत्राचे असे राज्यामध्ये एकूण सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्राचे शेतीपिक नुकसान झालेले आहे.

त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित तालुके घोषित करण्यात आले होते. या मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील अतिवृष्टी व पूर, पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे.

या घटकांनी पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहेत. सदर तालुक्यातील सर्व आपदग्रस्त/बाधितांना दुष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे.

सदर सवलती पुढीलप्रमाणे,१) जमीन महसूलात सूट२) सहकारी कर्जाचे पुनर्गठन३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती (एक वर्षासाठी)४) तिमाही वीज बिलात माफी५) परीक्षा शुल्कात माफी व १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी.जिल्हानिहाय तालुक्यांची यादी

अ.क्र.जिल्हाअंशतः बाधित तालुकेपूर्णतः बाधित तालुकेबाधित तालुक्यांची संख्या
1पालघर-पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड4
2नाशिककळवण, देवळा, इगतपुरीमालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला15
3धुळे-धुळे, साक्री, सिंदखेडा3
4जळगाव-एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर13
5अहिल्यानगर (नगर)पारनेर, संगमनेर, अकोलेअहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव14
6पुणे-हवेली, इंदापूर2
7सोलापूरउत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला-11
8सांगलीकडेगावमिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठेमहाकाळ, विटा, आटपाडी, जत10
9सातारासातारा, कराड, पाटण, फलटण, जावळीकोरेगाव, खटाव, माण8
10कोल्हापूरकागल, शिरोळ, पन्हाळाकरवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड8
11छ. संभाजीनगर-छ. संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री9
12जालना-बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद8
13बीड-बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी11
14लातूर-लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरुरअनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर10
15धाराशिव (उस्मानाबाद)-धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा8
16नांदेड-कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी16
17परभणी-पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी9
18हिंगोली-हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत5
19बुलढाणानांदूरा, संग्रामपूरचिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगावजामोद13
20अमरावती-अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, दर्यापुर14
21अकोला-अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी7
22वाशिम-वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा6
23यवतमाळ-पुसद, यवतमाळ, बाभूळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी जामणी16
24वर्धा-वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा आष्टी7
25नागपूर-नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, मिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड13
26भंडारा-साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखनी, लाखंदूर7
27गोंदियातिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी, आमगाव,देवरी8
28चंद्रपूर-चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा, जिवती, ब्रम्हपुरी14
29गडचिरोलीचारमोशी, कोरचीगडचिरोली, धानोरा, मूलचेरा, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, सिरोचा, भामरागड, एटापली, देसाईगंज (वडसा)12
 एकूण31251282

 अंशतः बाधित तालुक्यामध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीस पात्र असतील.

अधिक वाचा: पूरग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजचा जीआर आला; कोणत्या घटकाला किती मदत? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Revised list: Flood relief for these Maharashtra talukas announced.

Web Summary : Maharashtra announces flood relief for affected talukas due to heavy rains. Farmers will receive land revenue waivers, loan restructuring, and electricity bill exemptions. A revised list of eligible talukas district-wise has been released.
टॅग्स :पूरशेतीशेतकरीपीकमहाराष्ट्रराज्य सरकारसरकारशासन निर्णयतालुकादुष्काळ