यशवंत परांडकर
यावर्षी ऊस गाळप प्रक्रिया १ नोव्हेंबर रोजी सुरू झाली असून, अवघ्या ३४ दिवसांतच मराठवाड्याच्या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखान्यांनी २४ लाख ३० हजार २७२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यामध्ये लातूर जिल्हा सर्वात पुढे असून त्या पाठोपाठ परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. ऊस गाळपाकरिता अंदाजित तीन ते चार महिने राहिल्यामुळे गाळपाची गती वाढविणे गरजेचे असल्याचे साखर संचालकांनी सांगितले.
नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) अंतर्गत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली असे चार जिल्हे येतात. या जिल्ह्यांत ३० कारखाने येत असून एका कारखान्याने गाळप केले नाही. १ नोव्हेंबरपासून उसाची गाळप प्रक्रिया सुरू झाली आहे. परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना, कानडखेडने १ लाख ३२ हजार २२५ उसाचे गाळप केले.
गंगाखेड शुगर अँड एनर्जी, माखणी १९०७७०, योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज, लिंबा ४८६६५, ट्रॅटीवन शुगर, सायखेडा १३९७०१, रेणुका शुगर, देवनांद्राने ५०२२०, श्री लक्ष्मी नरसिंह शुगर आमडापूर कारखान्याने ११७९९५ मेट्रिक टन गाळप केले. हिंगोली जिल्ह्यात शिऊर साखर कारखाना, वाकोडी १०१२११, टोकाई कारखाना, कुरुंदा २९२६०, पूर्णा सहकारी साखर कारखाना, वसमतनगर १०३३००, भाऊराव चव्हाण कारखाना, डोंगरकडा ५५३६०, कपिश्वर शुगर कारखाना, जवळाबाजारने ९६३२० मेट्रिक टन. उसाचे गाळप केले.
नांदेड जिल्ह्यात सुभाष शुगर कारखाना, हदगाव ११४१४९, एमव्हीके वागळवाडा ७१३३०, कुंदूरकर शुगर कारखाना, कुंटूर १०९७०, भाऊराव चव्हाण कारखाना, देगाव ८६६३०, ट्रॅटीवन शुगर कारखाना, शिवनी ८४४७५, शिवाजी सर्व्हिस मांजरी-बाराळी या कारखान्याने ५५७५० मे. टन उसाचे गाळप केले.
लातूर जिल्ह्यात शेतकरी सहकारी कारखाना, किल्लारी २३०६०, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखाना, ११३५५०, शिपा निलंगेकर कारखाना, अंबुलगा ६८८२६, सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, उजना ११९५९५, श्री साईबाबा शुगर, शिवनी ८५२०, पत्रगेश्वर पानेगाव ४५३०, जागृती शुगर तळेगाव १०८५३०, संत शिरोमणी मारुती महाराज कारखाना, बेलकुंड ४४२०३, विलास कारखाना, तोंडार ९१४३०, विलास कारखाना, वैशालीनगर निवळी १०७९००, ट्रेंटीवन शुगर, माळवटी १८३२२६, रेणा निवाडा या कारखान्याने ६८५७० मेट्रिक टन उसाचे गाळप केले.
१८४९७३९ क्विंटल साखर उत्पादित...
नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील २९ साखर कारखान्यांमधून १८४९७३९ क्विंटल साखर उत्पादित झाली.
४ जिल्ह्यांतील साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)
परभणी - ४८६६१०हिंगोली - ३०६४००नांदेड - ३२२४९०लातूर - ७३४२३९
Web Summary : In 34 days, 29 Marathwada factories crushed 24.30 lakh metric tons sugarcane. Latur leads, followed by Parbhani, Nanded, Hingoli. Production reached 1849739 quintals.
Web Summary : 34 दिनों में, मराठवाड़ा की 29 फैक्ट्रियों ने 24.30 लाख मेट्रिक टन गन्ने की पेराई की। लातूर सबसे आगे, उसके बाद परभणी, नांदेड़, हिंगोली हैं। उत्पादन 1849739 क्विंटल तक पहुंचा।