राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक नियतन प्रमाणात जानेवारी २०२६ पासून बदल होणार आहे.
अंत्योदय कार्डधारकांकरिता प्रती शिधापत्रिका २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांकरिता ३ किलो तांदूळ व २ किलो गहू असे वाटप करण्यात येणार आहे.
सुरुवातीला अंत्योदय कार्डधारकांकरिता प्रती शिधापत्रिका २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांकरिता ३ किलो तांदूळ व २ किलो गहू असे वाटप करण्यात येत होते.
मात्र, त्यात पुरवठा विभागाने बदल करून अंत्योदय कार्डधारकांकरिता प्रती शिधापत्रिका २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांकरिता ४ किलो तांदूळ व १ किलो गहू असे वाटप सुरू करण्यात आले होते.
येत्या जानेवारी २०२६ पासून पुन्हा होणार हे बदल
◼️ अंत्योदय कार्डधारकांकरिता प्रती शिधापत्रिका २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू
◼️ प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांकरिता ३ किलो तांदूळ व २ किलो गहू असे वाटप केले जाणार आहे.
मात्र, डिसेबर २०२५ साठी सध्याचे प्रमाण म्हणजेच अंत्योदयसाठी प्रती शिधापत्रिका २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू आणि प्राधान्यांसाठी प्रती सदस्यांकरिता ४ किलो तांदूळ व १ किलो गहू असे वाटप करण्यात येणार असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अधिक वाचा: थंडीच्या दिवसात आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करतंय 'हे' एक फळ; जाणून घ्या सविस्तर
