Join us

देशात दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; शेतीपुढे 'हे' मोठं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 10:07 IST

भारतातील लघु शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी सुमारे ७५ लाख अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची गरज आहे.

नवी दिल्ली: भारतातील लघु शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी सुमारे ७५ लाख अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची गरज आहे, असे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे (आयएफएडी) अध्यक्ष अल्वारो लारियो यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागांत निधी पोहोचवणे जगभरात व भारताच्या ग्रामीण समुदायांसाठी एक गंभीर आव्हान आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीला अधिक लाभदायक कसे करू शकतो?

उत्पादकता कसे वाढवू शकतो? आणि खाद्य सुरक्षेकडून पोषण सुरक्षेकडे कसे जाऊ शकतो, हे आयएफएडीसमोर आव्हान आहे, असे ते म्हणाले.

जागतिक अन्न संकटाच्या उत्तरात १९७७मध्ये स्थापित आयएफएडी ही एक विशेष संयुक्त राष्ट्र यंत्रणा व आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. ती ग्रामीण समुदायांना भूकबळी व गरिबीपासून निपटण्यासाठी मदत करते.

ग्रामीण भाग, विशेषकरून लघु शेतकऱ्यांवर हवामान बदलाच्या प्रभावाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लारियो म्हणाले की, हा चिंतेचा प्रमुख विषय आहे. याच्याशी निपटण्यासाठी ७५ अब्ज डॉलरची गरज आहे.

दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी ८६.२ टक्के◼️ वित्त वर्ष २०१५-१६च्या १०व्या कृषी जनगणनेनुसार, दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी भारतातील एकूण शेतकऱ्यांपैकी ८६.२ टक्के आहेत. परंतु, त्यांच्याकडे केवळ ४७.३ टक्के जमीन आहे.◼️ भारतात मौसमी पावसाची कमतरता, वाढते तापमान, जास्त वेळा दुष्काळ पाहायला मिळतो.◼️ यामुळे जागतिक स्तरावर लहान शेतकऱ्यांना मदत करणारी गुंतवणूक आवश्यक आहे, असे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे (आयएफएडी) अध्यक्ष अल्वारो लारियो यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा: सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रातच; कोणत्या बँकेचे किती कर्ज? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीहवामान अंदाजभारतअन्न