हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात यावर्षी मोठ्या आशेने कांदा बीज उत्पादनाची (कांदा डेंगळे) लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी यंदा घोर निराशा पडली आहे.
पीक जोमात असतानाच परागीभवनसाठी आवश्यक असलेल्या मधमाशांनी कांदा पिकाकडे पाठ फिरवल्याने उत्पन्नात प्रचंड घट होताना दिसत असून, लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
यंदा गोरेगाव आणि परिसरात शेकडो एकरांवर विविध कंपन्यांशी करार करून कांदा बीज उत्पादन घेण्यात आले. पिकाला फूल गोंडे आल्यानंतर परागीभवन होणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, याच काळात परिसरात असलेल्या चिया पिकाचा फुलोरा आणि आंब्याचा मोहर यांकडे मधमाशा मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाल्या.
परिणामी, कांदा पिकाच्या गोंड्यांवर मधमाशांची उपस्थिती नगण्य राहिली, ज्याचा थेट फटका उत्पादनाला बसला आहे. कांदा बीज उत्पादनासाठी बी-बियाणे, खते आणि मजुरी असा एकरी ऐंशी हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च केला, तर मधमाशीच्या आकर्षणासाठी गुळ आणि वेलचीच्या पाण्याचे मिश्रण फवारले, तर काहींनी कृषी केंद्रांतून महागडी औषधे आणून फवारणी केली.
इतकेच नव्हे तर, अनेक शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून भाड्याने मधमाशी पालनाच्या पेट्याही शेतात आणून ठेवल्या. मात्र, निसर्गाच्या ओढीपुढे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. मात्र, परागीभवन नीट न झाल्याने डेंगळ्यांमध्ये दाणेच भरले गेले नाहीत. आता काढणीला सुरुवात झाली असता, डेंगळे पोचट निघत असल्याचे समोर येत आहे.
मधमाशांअभावी डेंगळे रिकामी राहिली आहेत. एकरी लाखो रुपये खर्च करूनही हातात काहीच पडत नसल्याने जगावे कसे, असा प्रश्न उभा ठाकल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
उत्पन्नात ६० ते ७० टक्के घट
एक एकर कांदा पिकासाठी एकूण जवळपास एक लाख रुपये खर्च आला. पीक जोमात बहरले. मात्र, विविध प्रयोग करूनही मधमाशांअभावी परागीभवन होऊ शकले नाही. परिणामी कांदा डेंगळे पूर्णतः भरली नसल्याने उत्पन्नात निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. भास्करराव खिल्लारी शेतकरी.
Web Summary : Hingoli farmers face massive onion seed production losses due to poor pollination. Bee attraction to other crops led to empty seed pods. Farmers invested heavily, but nature's pull resulted in 60-70% yield reduction, leaving them financially devastated.
Web Summary : परागण की कमी के कारण हिंगोली के किसानों को प्याज के बीज के उत्पादन में भारी नुकसान हुआ। अन्य फसलों के प्रति मधुमक्खियों के आकर्षण के कारण बीजकोष खाली रह गए। किसानों ने भारी निवेश किया, लेकिन प्रकृति के खिंचाव के कारण 60-70% उपज में कमी आई, जिससे वे आर्थिक रूप से तबाह हो गए।