Join us

उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 11:17 AM

वेळापत्रकात नसतानाही उष्णता आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी यामुळे हे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

दत्ता पाटीलझुलपेवाडी (ता आजरा) येथील धरणातून गत दोन आवर्तानादरम्यान उपसाबंदीच्या माध्यमातून बचत केलेले ५० एमसीएफटी पाणी केवळ पिण्यासाठी आज शुक्रवारपासून सोडण्यात आले आहे.

वेळापत्रकात नसतानाही उष्णता आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी यामुळे हे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

यासाठी चिकोत्रा नदीवरील तसेच परिसरातील विहिरीवरील विद्युतपंपासाठी उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. तर शेतीसाठी १९ मे रोजी शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. पाटबंधारे व महावितरणच्या समन्वयामुळे बचत झालेल्या पाण्याचा ऐन उन्हाळ्यात या लाभक्षेत्रातील जवळपास ३५ गावांना होणार आहे.

गत महिन्यात २२ ऐवजी १८ एप्रिल रोजी पाणी सोडले होते. वळीव पावसाची हुलकावणी आणि वाढती उष्णता यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. बेळुंकी या शेवटच्या बंधाऱ्यात पाणी पोहचल्यानंतर हे पाणी बंद करण्यात येणार आहे. धरणात सध्या ४१ टक्के पाणीसाठा आहे.

गारगोटी, पिंपळगाव, उत्तुर, मुरगुड, सोनगे कापशी, लिंगनुर येथील वीज वितरण उपकेंद्रांना उपसाबंदी करण्याबाबत पाटबंधारे विभागाने लेखी पत्र दिले आहे.

ग्रामपंचायतीना आवाहननागरिकांना पाणी जपून वापरण्यासह संबंधित गावातील शेतकऱ्यांनी आपली विद्युत पंप ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. असे आवाहन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिकोत्रा खोऱ्यातील ग्रामपंचायतींना नोटीसाद्वारे केले आहे.

वाढत्या उन्हामुळे नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार केवळ पिण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. - महेश चव्हाण, सहाय्यक अभियंता, वेदगंगा-चिकोत्रा उपविभाग

अधिक वाचा: Summer Tillage उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी?

टॅग्स :शेतकरीशेतीपीकपाणीधरण