Lokmat Agro >शेतशिवार > 'त्या' एका कारणाने पुन्हा एकदा नाचणीची गोडी वाढली 'या' जिल्ह्याच्या लागवड क्षेत्रात यंदा वाढ

'त्या' एका कारणाने पुन्हा एकदा नाचणीची गोडी वाढली 'या' जिल्ह्याच्या लागवड क्षेत्रात यंदा वाढ

The sweetness of nachani has increased once again due to 'that' reason. The cultivation area of 'this' district has increased this year. | 'त्या' एका कारणाने पुन्हा एकदा नाचणीची गोडी वाढली 'या' जिल्ह्याच्या लागवड क्षेत्रात यंदा वाढ

'त्या' एका कारणाने पुन्हा एकदा नाचणीची गोडी वाढली 'या' जिल्ह्याच्या लागवड क्षेत्रात यंदा वाढ

भातपिकानंतर खरीप हंगामात डोंगरउतारावर नागली अर्थात नाचणी हे पीक घेण्याचे प्रमाण रायगड जिल्ह्यात आता वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होणार आहे.

भातपिकानंतर खरीप हंगामात डोंगरउतारावर नागली अर्थात नाचणी हे पीक घेण्याचे प्रमाण रायगड जिल्ह्यात आता वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भातपिकानंतर खरीप हंगामात डोंगरउतारावर नागली अर्थात नाचणी हे पीक घेण्याचे प्रमाण रायगड जिल्ह्यात आता वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होणार आहे. पेण तालुकाही या पिकाच्या लागवडीत आघाडीवर असून, २१० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे.

मेहनत जास्त आणि मोबदला कमी असल्याने या पिकाचे क्षेत्र सातत्याने घटत होते. पण, पाच-सहा वर्षांपासून सकस आहार म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे. डोंगरमाथ्यावर केल्या जाणाऱ्या या शेतीतून येथील आदिवासींना हमखास उत्पन्न मिळू लागल्याने पिकाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

पेण तालुक्यातील २१० हेक्टरवर लागवड

पेणमधील पाबळ खोरे, महलमीरा डोंगर या उंच डोंगरमाथ्यावर आदिवासी समाज वरकस जमिनीवर मोठ्या प्रमाणात नागली पीक घेतात. पेणमध्ये २१० हेक्टर क्षेत्रात म्हणजे ४७५ एकर क्षेत्रात लागवड केली आहे.

नाचणी हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजले जाते. या तृणधान्यात पोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणाऱ्या कॅल्शिअमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात. रायगड जिल्ह्यातील जमीन नागली पिकासाठी उत्तम असल्याने या पिकाचे क्षेत्र वाढविण्याकडे कृषी विभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. - सतीश गायकवाड, कृषी सहायक, पेण.

'हे' तर गवतवर्गीय कुळातील अतिशय महत्त्वाचे पीक

• नाचणी हे गवतवर्गीय कुळातील पीक आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्व आणि पश्चिम भागांतील जास्त पाऊस पडणाऱ्या पश्चिम घाट विभागात पूर्वी मोठ्या प्रमाणात केली जात असे.

शेती परवडत नसल्याचे कारण देत येथील शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले. यात सर्वाधिक फटका नाचणी पिकाला बसला होता.

• यंदाच्या खरीप हंगामासाठी नागली पिकासाठी कृषी विभागाकडून १,५७२ प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. यातून पिकाची लागवड कशी करायची, शेतीचे नियोजन कसे करायचे याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

Web Title: The sweetness of nachani has increased once again due to 'that' reason. The cultivation area of 'this' district has increased this year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.