Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > तुकडेबंदी नियमित करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती तयार झाली; होणार 'हे' पाच फायदे

तुकडेबंदी नियमित करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती तयार झाली; होणार 'हे' पाच फायदे

The necessary procedures for regularizing fragmentation have been prepared; now these five benefits will be available | तुकडेबंदी नियमित करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती तयार झाली; होणार 'हे' पाच फायदे

तुकडेबंदी नियमित करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती तयार झाली; होणार 'हे' पाच फायदे

tukdebandi kayda तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली आहे.

tukdebandi kayda तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली आहे.

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली आहे.

याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश महसूलमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केले. या निर्णयाचा राज्यातील ६० लाख कुटुंबांसह सुमारे ३ कोटी नागरिकांना फायदा होणार आहे.

विशेष म्हणजे, 'तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार' हा सातबाऱ्यावरील शेरा काढून टाकला जाईल. आठ मुद्द्यांच्या या कार्यपद्धतीने महाराष्ट्रातील अनेक वर्षापासून रखडलेला छोट्या जमिनीचा व्यवहार कायदेशीर होईल.

महसूल विभागाने याबाबतची कार्यपद्धती जारी केली असून, १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेल्या जमीन व्यवहारांना लागू असणार आहे. यासंदर्भात कार्यपद्धतीसंदर्भातील पत्र संबंधितांना पाठविण्यात झाले आहे.

तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करण्यासाठी दंड कमी करूनही नागरिक पुढे येत नसल्याने आता शासनाने कोणतेही मूल्य न आकारता हे व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली.

कसा होणार फायदा?
१) सातबाऱ्यावर नाव लागणार

अनेकदा गुंठेवारीने घेतलेल्या जमिनींची नोंद 'तुकडेबंदी' कायद्यामुळे सातबारा उताऱ्यावर होत नव्हती किंवा झाल्यास ती 'इतर हक्कात' होत असे.
२) फेरफार रद्द झाला असल्यास
यापूर्वी खरेदीचा फेरफार रद्द झाला असेल, तर तो पुन्हा तपासून मंजूर केला जाईल व खरेदीदाराचे नाव कब्जेदार म्हणून लावले जाईल.
३) इतर हक्कात नाव असल्यास
ज्यांचे नाव सध्या सात बाराच्या 'इतर हक्कात' आहे, त्यांचे नाव आता मुख्य 'कब्जेदार' सदरात घेतले जाईल.
४) शेरा कमी करणे
'तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार' असा जर काही शेरा सातबाऱ्यावर असेल, तर तो काढून टाकला जाईल.
५) फक्त नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर व्यवहार असेल तर
ज्यांनी फक्त नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर व्यवहार केले आहेत व दस्त नोंदणीकृत नाहीत, अशा नागरिकांना तलाठी व अधिकारी दस्त नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतील. मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी केल्यानंतर त्यांचीही नावे सातबारावर लावली जातील.

अधिक वाचा: पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Web Title : भूमि विभाजन नियमित करने की प्रक्रिया निर्धारित; पाँच लाभ घोषित।

Web Summary : महाराष्ट्र ने भूमि नियमितीकरण को सरल बनाया, जिससे लाखों लोगों को लाभ होगा। 1965-2024 के लेनदेन नियमित किए जाएंगे, भूमि अभिलेखों पर 'अवैध विभाजन' टिप्पणी हटाई जाएगी। भूमि अभिलेखों में नाम जोड़े जाएंगे, पिछली अस्वीकृतियों की समीक्षा की जाएगी और अपंजीकृत सौदों को प्रोत्साहित किया जाएगा। इस कदम से पहले रुके हुए छोटे भूमि लेनदेन वैध हो जाएंगे।

Web Title : Procedure set to regularize land fragmentation; five benefits announced.

Web Summary : Maharashtra simplifies land regularization, benefiting millions. Transactions from 1965-2024 will be regularized, removing 'illegal fragmentation' remarks on land records. Names will be added to land records, past rejections reviewed, and unregistered deals encouraged. This move legalizes previously stalled small land transactions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.