lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > कोकणातील विनामशागत तंत्र वापरलं, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला उत्पादनवाढीचा मार्ग

कोकणातील विनामशागत तंत्र वापरलं, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला उत्पादनवाढीचा मार्ग

The farmers of Marathwada have got a way to increase their production by using the vinous cultivation technique of Konkan | कोकणातील विनामशागत तंत्र वापरलं, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला उत्पादनवाढीचा मार्ग

कोकणातील विनामशागत तंत्र वापरलं, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला उत्पादनवाढीचा मार्ग

कोकणातल्या भातशेतीसाठीचं विनामशागतीचं तंत्र मराठवाड्यातील शेतकरीही वापरू लागले आहेत.

कोकणातल्या भातशेतीसाठीचं विनामशागतीचं तंत्र मराठवाड्यातील शेतकरीही वापरू लागले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

बापू सोळुंके

कोकणात भातशेतीसाठी वापरलेले जाणारे विनामशागतीचे तंत्रज्ञान सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरीही स्वीकारू लागले आहेत. जिल्ह्यातील बाराशे शेतकऱ्यांनी गतवर्षी तब्बल अडीच हजार एकर शेती विनामशागतीची केली.

पारंपरिक पिकांच्या तुलनेत या शेतीतून मिळणारे उत्पादन वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय नांगरणे, वखरणे, कोळपणे आणि निंदणे इ.वर होणारा खर्चही कमी झाल्याने हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचा दावा कृषी अधिकारी करतात. कोणत्याही पिकाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचा पोत चांगला असावा लागतो. पोत उत्तम राहण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब, गांडूळ, जीवाणूंची चांगली वाढ होणे आवश्यक असते.

यासाठी जमिनीतच तण, पिकांची मुळे, खुंट राहू देणे, काडी, कचरा, गवत सडू देणे आवश्यक असते. मात्र आपल्याकडे दरवर्षी शेतीची नांगरणे, वखरणी, रोटाव्हेटर करणे इ. मशागतीची कामे करण्यात येतात. खरीप हंगामापूर्वी शेतकरी शेतात साफसफाई करतात. यामुळे जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ होत नाही. यामुळे पिकाला पोषक असे सेंद्रिय कर्ब आणि जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी जमिनीची मशागत करू नका, असे सांगणारे एसआरटी तंत्रज्ञान दहा वर्षांपूर्वी कोकणात भातशेतीमध्ये वापरले जाऊ लागले. गादी वाफा पद्धतीने शेती करावी. गादी वाफ्यात पिकाची लागवड, पेरणी करावी. दरवर्षी पीक बुडापासून कापून घ्यावे, पण पिकाची मुळे, खूंट, खोड जमिनीतच राहू द्यावी, असे हे तंत्रज्ञान सांगते.

आमची दहा एकर शेती चार वर्षापासून विनामशागतीची आहे. पारंपरिक शेतीसाठी नांगरणे, वखरणे, लागवडीनंतर कोळपणी आणि निदण यावर होणारा खर्च या तंत्रज्ञानात वाचतो. तणनाशकाचा वापर करतो. यामुळे मजुरावरील खर्चही कमी झाला. जमिनीत सेंद्रिय कर्ब टिकून राहत असल्याने उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. -प्रभाकर सुसलोदे, शेतकरी, रुईखेडा, ता. कन्नड

२०१९ रोजी कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील मोजक्याच शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विनामशागतीची शेती सुरू केली. त्यांना या शेतीतून मिळणारे उत्पादन वाढले आणि खर्चही कमी झाला. कन्नडसह फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुक्यातील एकूण बाराशे शेतकऱ्यांनी हे तंत्र स्वीकारले. ही माहिती एसआरटी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शक तथा निवृत्त कृषी अधिकारी सुरेशसिंग बेडवाल यांनी दिली.

Web Title: The farmers of Marathwada have got a way to increase their production by using the vinous cultivation technique of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.