पुणे : राज्य सरकारतर्फे अर्थसंकल्पात दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या प्रवीण परदेशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा असून, त्यानंतरच त्यातील निकष आणि संख्या स्पष्ट होणार आहे.
हा अहवाल गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे सादर केला जाणार होता. मात्र, अजूनही त्यासंदर्भात अभ्यास सुरू असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे हा अहवाल सादर होऊन शेतकऱ्यांची नावे आणि संख्या स्पष्ट होण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे.
त्यापूर्वीच राज्य सरकारने माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्य उच्च अधिकार समिती नेमली आहे. ही समिती कर्जमुक्तीसाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचविणार आहे.
तसेच, कर्जमाफी देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही निश्चित करणार आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून आहेत. समितीचा अहवाल एप्रिलअखेर देण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.
सहकार विभागातर्फे कोणकोणती माहिती गोळा होणार?◼️ वेगवेगळ्या योजनांमधील शेतकऱ्यांची संख्या.◼️ उपलब्ध जमीन, त्या जमिनीचा पिकांसाठीचा वापर.◼️ केंद्र व राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा लाभ घेणारे शेतकरी.◼️ अतिवृष्टीत मदत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या◼️ साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित एफआरपी मिळत असल्यास अशा शेतकऱ्यांची संख्या गोळा करण्यात येत आहे.
राज्य सरकारने यापूर्वी २०१६ आणि २०१९ मध्ये कर्जमाफी दिली होती. यातून खऱ्या व गरजू शेतकऱ्यांची संख्या कळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या योजनेत समाविष्ट शेतकऱ्यांची संख्या तपासण्यात येत आहे.
सर्व माहिती गोळा करून किती शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, कोणते शेतकरी पात्र ठरू शकतात त्यासाठी किती निधी लागू शकतो, याचा अजून अभ्यास सुरू आहे.
अधिक वाचा: कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Maharashtra's loan waiver hinges on the Praveen Pardeshi committee report. The government awaits the report to finalize eligibility and beneficiary numbers. The report will include farmer data from various schemes, land usage, and government aid received, determining loan waiver needs and beneficiary eligibility.
Web Summary : महाराष्ट्र में कर्ज माफी प्रवीण परदेशी समिति की रिपोर्ट पर निर्भर है। सरकार पात्रता और लाभार्थी संख्या को अंतिम रूप देने के लिए रिपोर्ट का इंतजार कर रही है। रिपोर्ट में विभिन्न योजनाओं, भूमि उपयोग और सरकारी सहायता प्राप्त किसानों का डेटा शामिल होगा, जिससे कर्ज माफी की आवश्यकताओं और लाभार्थी पात्रता का निर्धारण होगा।