Join us

Tango Santra: टँगो गोल्डमुळे संत्रा उत्पादकांना येतील सोनेरी दिवस कसे ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 10:01 IST

Tango Santra: संत्र उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्तम नर्सरी, संत्र्याची गुणवत्ता आणि मार्केटिंग या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास सोनेरी दिवस येणार. वाचा सविस्तर

नागपूर : स्पेनच्या व्हॅलेन्शियामध्ये टँगो संत्र्याचे एकरी उत्पन्न २५ ते ३० टन आहे. विदर्भातील संत्र्याचे एकरी उत्पन्न चार ते सहा टन आहे. हे उत्पन्न २० टनांच्यावर जाईल, असा निर्धार करणे गरजेचे आहे. (Tango Santra)

यासाठी उत्तम नर्सरी, संत्र्याची गुणवत्ता आणि मार्केटिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यावर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या कार्यशाळेत मंथन करण्यात आले. ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीने वनामती सभागृह येथे शुक्रवारी (१२ एप्रिल) रोजी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. (Tango Santra)

कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. खा. डॉ. अनिल बोंडे, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. डॉ. संजय कुटे, आ. दादाराव केचे, आ. सुमित वानखेडे, आ. चरणसिंग ठाकूर, आ. प्रताप अडसड, आ. श्याम खोडे, आ. उमेश यावलकर, सीआरआरआयचे संचालक डॉ. घोष, कृषितज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी, ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर, आनंदराव राऊत, सुधीर दिवे आदींची उपस्थिती होती.

उत्तम नर्सरी, संत्र्याची गुणवत्ता आणि मार्केटिंग या त्रिसूत्रीतून विदर्भातील शेतकऱ्यांना उत्पादन आणि उत्पन्न वाढविणे शक्य आहे, असा विश्वास नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी याप्रसंगी व्यक्त केला. (Tango Santra)

नर्सरी अपग्रेड करण्याची गरज

* 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' असं आपण म्हणतो. पण बीज उत्तम नसेल तर फळ कसे गोड येणार? उत्तम नर्सरी आणि रोगमुक्त रोपे महत्त्वाची आहेत. त्यासाठी नर्सरी अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे.

* स्पेनमध्ये एका हेक्टरमध्ये संत्र्याची ८२० झाडे असतात आणि आपल्याकडे ३४० झाडे असतात. त्यांनी झाडे वाढवलीच.

* उत्पादन वाढवताना पॅकेजिंग आणि मार्केटिंगचाही विचार केला. त्याच आधारावर व्हॅलेन्शियाचा संत्रा जगभर पोहोचला. व्यावसायिक दृष्टिकोन, गुणवत्ता, उत्तम नर्सरी, मार्केटिंग त्यातून आपल्यालाही हे शक्य गडकरी म्हणाले.

हे ही वाचा सविस्तर : Tango Orange: नागपुरी संत्र्याच्या उत्पादकतेचा तिढा; स्पेनच्या टँगोमुळे सुटेल का? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीफळेविदर्भ