Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > आंबटगोड चवीचं कवठ बाजारात दुर्मिळ, याचे फायदे एकदा वाचाच..

आंबटगोड चवीचं कवठ बाजारात दुर्मिळ, याचे फायदे एकदा वाचाच..

Sweet and sour flavoured wood apple is rare in the market, just read its benefits. | आंबटगोड चवीचं कवठ बाजारात दुर्मिळ, याचे फायदे एकदा वाचाच..

आंबटगोड चवीचं कवठ बाजारात दुर्मिळ, याचे फायदे एकदा वाचाच..

कमी खर्चाचे उत्कृष्ट चवीचे फळ,

कमी खर्चाचे उत्कृष्ट चवीचे फळ,

रविंद्र शिऊरकर 

गुणकारी, चविष्ठ आंंबटगोड चवींसह विविध औषधी गुणांनी समृद्ध असणारे कवठ फळ आता दूर्मिळ हाेत जात आहे. गेल्या काही वर्षांत बाजारपेठेत  फळ सध्या दिसेनासे झाले आहे. गावागावांत पूर्वी हमखास दिसणाऱ्या या फळाची नवीन पिढीला याची चव सुद्धा राहिलेली नाही. 

आपल्याकडील अनेक देशी फळांच्या व वनस्पतींच्या औषधी गुणांमुळे वर्षानुवर्षे त्यांचा विविध आजरपणात उपयोग केला जातो. अलिकडे विविध परदेशी फळे औषधी वनस्पती आपल्याकडे आल्या आहेत. मात्र, या सर्वांत आपण आपल्या देशी फळांनाही जपलं पाहिजे. 
गोड, आंबट, चिखट अशी आगळीवेगळी चव असलेले आणि कडक आवरणाने मजबूत असलेलं कवठ आकाराने तसे लहान. त्याच्या कठीण कवचामुळे त्याचं नाव कवठ पडलं असावं. पांढऱ्या रंगाच्या आसपास जाणारे आवरण असते तर आतून वीटकरी रंगाचा गर असतो. संस्कृतमध्ये याला दधीफल व कपित्थ असे म्हणतात, तर इंग्रजीमध्ये वूड एप्पल या नावाने या फळाला ओळखले जाते.

आरोग्यदायी फायदे 

बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन्स घटक असलेले हे फळ पचन क्रियेसंबंधी विविध आजरांत दीर्घ काळापासून उपयोगात आहे. तसेच या झाडाचा पाला हात पाय मुरगळला तर त्या ठिकाणी बांधला जातो. ज्यामुळे सूज कमी होत असल्याचे गाव खेड्यातील नागरिक सांगतात.

Web Title: Sweet and sour flavoured wood apple is rare in the market, just read its benefits.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.