अकोला : स्वामित्व योजनेत(Swamitva Yojana) जिल्ह्यात ७०४ गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत ७०४ गावांतील १ लाख १ हजार २१० मालमत्तांची सनद भूमी अभिलेख (Land and Record) कार्यालयामार्फत तयार करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित गावांतील मालमत्ताधारक ग्रामस्थांना आता मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या २२ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या निर्णयानुसार राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार १२ जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यात ड्रोनद्वारे(Drone) गावठाणांचे भूमापन सुरू करण्यात आले.
जुने नगर, भूमापन झालेली गावे, महानगरापालिका, नगरपालिका हद्दीतील गावे व उजाड गावे वगळता जिल्ह्यातील ७४० गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यापैकी डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील ७०४ गावांतील १ लाख १ हजार २१० मालमत्तांची सनद जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयामार्फत तयार करण्यात आली आहे.
नकाशासह मालमत्तांच्या मालकी हक्काचा आल्याने, संबंधित गावांतील मालमत्ताधारक ग्रामस्थांना मालमत्तांच्या मालकी हक्काचा गावांतील अद्ययावत पुरावा मिळणार आहे.
'सनद'चा फायदा काय?
• मालमत्ताधारकांना मालमत्ता मालकी हक्काचा पुरावा म्हणून मालमत्ता सनदचा वापर करता येणार आहे. सनदमध्ये मालमत्तेच्या सीमांची निश्चिती दर्शविण्यात आल्याने, मालमत्ता सीमांच्या कारणांवरून होणारे वाद टाळण्यास मदत होणार आहे.
• घरकुल योजना, कर्ज आदी शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी, तसेच जामीन घेण्याकरिता या मालमत्ता सनदचा फायदा होणार आहे.
१,३१,११६ प्रॉपर्टी कार्ड तयार!
जिल्ह्यात ७०४ गावांत १ लाख ५३ हजार ११२ मालमत्ताधारकांची संख्या असून, त्यापैकी आतापर्यंत १ लाख १ हजार २१० मालमत्तांची सनद तयार करण्यात आली असून, १ लाख ३१ हजार ११६ मालमत्तांची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) तयार करण्यात आली आहेत.
'सनद' मध्ये काय आहे?
जिल्ह्यातील जिल्ह्यातील ७०४ गावांतील मालमत्तांची सनद तयार करण्यात आली आहे. या 'सनद' मध्ये मालमत्ताधारकाचे नाव, मालमत्तेचा स्केल नकाशा आणि संबंधित मालमत्तेच्या चतु: सीमांची माहिती आहे.
ड्रोनद्वारे ७४० गावठाणांचे भूमापन !
स्वामीत्व योजनेत जिल्ह्यात ७४० गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये तेल्हारा ८३, अकोट १३१, बाळापूर ६२, अकोला १४०, मूर्तिजापूर १३३, पातूर ७३ व बार्शिटाकळी तालुक्यातील ११८ गावठाणांचे भूमापन करण्यात आले. त्यानंतर ७०४ गावांतील मालमत्तांची सनद व प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आलेल्या गावांपैकी १ लाख १ हजार २१० मालमत्तांची सनद तयार करण्यात आली आहे. मालमत्तांची सनद तयार करण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९३ टक्के असून, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ते सर्वाधिक आहे. - भारती खंडेलवाल, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख विभाग
गावे अन् मालमत्ता सनदची अशी आहे संख्य
तालुका | गावे | सनद |
तेल्हारा | ७९ | ११,९७८ |
अकोट | १२६ | १६,६७७ |
बाळापूर | ६२ | ९,८९६ |
अकोला | १३३ | १९,५२७ |
मूर्तिजापूर | १२२ | १५,६३२ |
पातूर | ७० | ११,४५९ |
बार्शीटाकळी | ११२ | १६,०४१ |