Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील 'या' १९ कारखान्यांचे ऊस दर जाहीर; कोणत्या कारखान्याने दिला सर्वाधिक दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:03 IST

ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांचा गाळप बंद पाहू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी देताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.

सोलापूर : ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांचा गाळप बंद पाहू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी देताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.

मंगळवार, ९ डिसेंबरपर्यंत दर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिले. ३४ पैकी १९ कारखान्यांनी दर जाहीर केले आहे.

उर्वरित १५ कारखाने दर जाहीर करावेत, यासाठी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.

ज्या साखर कारखानदारांनी अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही, अशा कारखानदारांना तंबी देत संबंधितांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी दिला.

ऊस दर जाहीर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातून रोज संबंधित कारखान्यांना रोज फोन जात आहे. संबंधित पाठपुराव्याचा अहवाल साखर आयुक्तांना पाठविल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी १४ नोव्हेंबर तसेच १७ नोव्हेंबर रोजी साखर कारखानदारांसोबत बैठक घेतली. बैठकीत सर्व कारखान्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत ऊस दर जाहीर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

या निर्देशानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आहे. उर्वरित १५ कारखान्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडूनही तत्काळ दर जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

दर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांची गंभीर दखल घेण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी संबंधित सर्व ऊस कारखानदारांना कळविण्यात आल्याची माहिती दिली. हे कारखानदार दर केव्हा जाहीर करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दर जाहीर केलेले कारखानेसाखर कारखान्यांची नावे - दर१) श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना - २८८५२) सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना - २८५०३) विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना - २८००४) श्री संत कुर्मदास साखर कारखाना - २८५०५) माळीनगर साखर कारखाना - २८००६) ओंकार कार्पोरेशन, म्हैसगाव - २८००७) जकराया साखर कारखाना - ३१५०८) भैरवनाथ साखर कारखाना - २८००९) राजवी अ‍ॅग्रो पॉवर - २८००१०) बबनरावजी शिंदे साखर कारखाना - ३००१११) ओंकार साखर कारखाना, चांदापुरी - २८५०१२) विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, करकंब - ३१५०१३) आष्टी साखर कारखाना - २८५०१४) सिताराम महाराज साखर कारखाना - २८००१५) श्री शंकर सहकारी साखर काखाना - २८०० प्लस१६) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना - २९००१७) विठ्ठल रिफाइंड साखर कारखाना - २८७५१८) शिवगिरी अ‍ॅग्रो साखर कारखाना - २८७५१९) येडेश्वरी अ‍ॅग्रो कारखाना - ३००१

दर जाहीर न केलेले कारखाने१) आवताडे साखर कारखाना, नंदूर२) धाराशिव साखर कारखाना, सांगोला३) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना४) भीमा सहकारी साखर कारखाना५) व्हीपी साखर कारखाना६) जयहिंद साखर कारखाना७) श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना८) श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना९) लोकनेते बाबुराव पाटील कारखाना१०) लोकमंगल अ‍ॅग्रो, बीबीदारफळ११) लोकमंगल, भंडारकवठे१२) सिद्धनाथ साखर कारखाना, तिऱ्हे१३) इंद्रेश्वर साखर कारखाना१४) युटोपियन साखर कारखाना१५) गोकुळ साखर कारखाना

अधिक वाचा: राज्य शासनाच्या 'या' योजनेतून मिळणार मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; कुठे आणि कसा कराल अर्ज?

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Sugar Factories Announce Cane Rates; Highest Rate Declared?

Web Summary : Solapur district administration pushes sugar factories to declare cane rates after warning. Nineteen factories announced rates, Jakraya and Vitthalrao Shinde offering the highest.
टॅग्स :साखर कारखानेऊससोलापूरशेतकरीकाढणीजिल्हाधिकारीआयुक्तराजू शेट्टी