Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane Factory : राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार

Sugarcane Factory : राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार

Sugarcane Factory: National level cooperative sugar factories awards announced; Maharashtra gets 10 awards | Sugarcane Factory : राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार

Sugarcane Factory : राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार

पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला या गटात देशातील एकूण 58 सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता.

पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला या गटात देशातील एकूण 58 सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता.

शेअर :

Join us
Join usNext

देशातील सर्व 260 सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते व त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय सह सचिव (सहकार) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे वर्ष 2023-24 साठीची निश्चित केलेली एकूण 25 पारितोषिके राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज जाहीर केली. याप्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

यंदाच्या [2023-24] वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशभरातून 103 सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला. त्यात महाराष्ट्र [41], उत्तर प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडू मधून [प्रत्येकी 12], हरियाणा [10], पंजाब [9] कर्नाटक [5] आणि मध्य प्रदेश व उत्तराखंडमधून प्रत्येकी एक कारखान्याने सहभाग घेतला होता.

पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला या गटात देशातील एकूण 58 सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण 45 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच "एका कारखान्याला एक पारितोषिक" असे धोरण ठरविण्यात आले. या दोन्ही धोरणांमुळे सर्व कारखान्यांच्या कामगिरी ला न्याय मिळतो. तसेच जास्तीत जास्त कारखान्यांना पारितोषिक मिळविता येतात.

पारितोषिकांचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यात केंद्रीय सह सचिव [सहकार] यांच्याशिवाय मुख्य संचालक, राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ नवी दिल्ली, उप संचालक (साखर) नवी दिल्ली, संचालक - राष्ट्रीय साखर संस्था, कानपुर, महासंचालक - वसंतदादा साखर संस्था पुणे, तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश होता.

राष्ट्रीय पारितोषिकांचा तपशील

उच्च उतारा विभाग (High Sugar Recovery Area)

उत्कृष्ट ऊस उत्पादकता: (Sugarcane Development)

1) प्रथम श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि., जुन्नर, जि. पुणे (महाराष्ट्र)
2) द्वितीय: क्रांती अग्रणी डॉ. जी डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., कुंडल, जि. सांगली (महाराष्ट्र)
3) तृतीय श्री महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग मंडळी लि., तहसील महुवा, जि. सुरत, (गुजरात)


तांत्रिक कार्यक्षमता : (Technical Efficiency)

4) प्रथम : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., कराड, जि. सातारा, (महाराष्ट्र)
5) द्वितीय : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., पो. श्रीपूर, जि. सोलापूर (महाराष्ट्र).
6) तृतीय : डॉ पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., पो. वांगी, जि. सांगली (महाराष्ट्र)

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन: (Financial Management)

7) प्रथमः कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., जि. जालना, (महाराष्ट्र)
8) द्वितीय : श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी लि., पांडवाई, जि. भरूच, (गुजरात)
9) तृतीय श्री नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडली लि., ता. राजपिपला (नांदोड), जि. नर्मदा (गुजरात)

विक्रमी ऊस गाळप (Highest cane crushing)

10) प्रथम विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., ता. माढा, जि. सोलापूर (महाराष्ट्र)

विक्रमी साखर उतारा (Highest Sugar Recovery)

11) प्रथम : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना लि., जि. कोल्हापूर, (महाराष्ट्र)

उच्च साखर उतारा विभागातील अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना (Overall Best Cooperative Sugar Factory)

12) श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., तालुका बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र)

उर्वरित विभाग (Other Sugar Recovery Area)

उत्कृष्ट ऊस उत्पादकता (Sugarcane Development)

13) प्रथम : बुधेवाल कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., जि. लुधियाना, (पंजाब)

14) द्वितीय : कल्लाकुरिची ॥ कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., जि. विल्लूपुरम (तामिळनाडू)

15) तृतीय : किसान सहकारी चीनी मिल्स लि., पोवायं, जि. शहाजहांपूर, (उत्तर प्रदेश)


तांत्रिक कार्यक्षमता (Technical Efficiency)

16) प्रथम : करनाल कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., जि. करनाल, (हरियाणा)

17) द्वितीय : चेय्यार कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., अंकावूर, जि. तिरुवन्नमलै, (तामिळनाडू)

18) तृतीय : किसान सहकारी चीनी मिल्स लि., सठिऔन, जि. आजमगढ़, (उत्तर प्रदेश)

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन (Financial Management)

19) प्रथम : नवलसिंग सहकारी शक्कर कारखाना मर्यादित, नवलनगर., जि. बुरहणपूर (मध्य प्रदेश)

20) द्वितीय : चेंगलरायन कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., थिरुवेनैनाल्लूर, जि. विल्लूपुरम, (तामिळनाडू)

21) तृतीय : धर्मापुरी डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., थैमानहळ्ळ्ळी, जि. धर्मापुरी (तामिळनाडू)

विक्रमी ऊस गाळप (Highest Cane Crushing)

22) प्रथम : रमाला सहकारी चीनी मिल्स लि., रमाला बरूत, जि. बागपत (उत्तर प्रदेश)

विक्रमी साखर उतारा (Highest Sugar Recovery)

23) प्रथम : किसान सहकारी चीनी मिल्स लि., गजरौला जि. अमरोहा, बागपत (उत्तर प्रदेश)

उर्वरित विभागातील अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना (Overall Best Cooperative Sugar Factory)

24) सुब्रमनिया शिवा कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि., गोपालापूरम, जि. धर्मापुरी (तामिळनाडू)

संपूर्ण भारतातील सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्यासाठीचा प्रतिष्ठित वसंतदादा पाटील पुरस्कार

25) यंदाच्या वर्षाचे संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि, दत्तात्रयनगर, ता. आंबेगाव, जि. पुणे (महाराष्ट्र) यांना मिळाले आहे.

एकूण 25 पारितोषिकात महाराष्ट्र ने एकूण 10 पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला असून दुसऱ्या क्रमांकावरील तमिळनाडूला 5 पारितोषिके प्राप्त झाली आहेत. उत्तर प्रदेशने 4, पारितोषिकांसह तिसरा क्रमांक पटकाविला तर गुजरात ने 3 पारितोषिकात सह चौथा क्रमांक मिळवला असून पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश राज्यांना प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले आहे.

Web Title: Sugarcane Factory: National level cooperative sugar factories awards announced; Maharashtra gets 10 awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.