स. सो. खंडाळकर
छत्रपती संभाजीनगर : यंदा उसाची लागवड घटल्याने मुदतीच्या आतच साखर कारखाने गाळप (Galap) थांबवणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील वर्षी मात्र लागवड (Cultivation) वाढल्याने उसाचे उत्पादन वाढेल.
साखर कारखाने सहा महिन्यांपर्यंत उसाचे गाळप करू शकतील, अशी शक्यता या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील २२ साखर कारखाने १५ नोव्हेंबर २०२४ पासून ऊस गाळप करीत आहेत. उसाचे क्षेत्र कमी असल्याने काही कारखाने यंदा सुरू होऊ शकले नाहीत.
जालना जिल्हा मागे
सुरू असलेल्या साखर कारखान्यांमध्ये ९३ हजार ६५० टन प्रतिदिवस उसाचे गाळप (Sugarcane Crushing) सुरू आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिदिन २३ हजार ५०० टन, जालना जिल्ह्यात १७ हजार टन व बीड जिल्ह्यात ३६ हजार ६५० टन उसाचे गाळप होत आहे. जालना जिल्हा मागे आहे.
लागवड वाढेल?
सन २०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, जळगाव, धुळे व नंदुरबार मिळून अशा सहा जिल्ह्यांमध्ये १ कोटी १५ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन होईल. २०२५- २६ मध्ये उसाची लागवड वाढणार आहे. कारण यावर्षी पावसाळा चांगला राहिला आहे.
चार महिन्यांतच गाळप संपेल ?
यंदा ऊस कमी असल्याने १८० दिवस, तर कारखाने चालू शकणार नाही. चार महिनेही कारखाने चालणार नाहीत, असे साखर सहसंचालक कार्यालयातील कृषी अधिकारी साहेबराव जेधे यांनी सांगितले.