Lokmat Agro >शेतशिवार > Sugar Quota : देशात ९० लाख टन साखर शिल्लक; ऑगस्टसाठी किती टन साखरेचा कोटा?

Sugar Quota : देशात ९० लाख टन साखर शिल्लक; ऑगस्टसाठी किती टन साखरेचा कोटा?

Sugar Quota : 90 lakh tonnes of sugar left in the country; How many lakh tonnes of sugar quota for August? | Sugar Quota : देशात ९० लाख टन साखर शिल्लक; ऑगस्टसाठी किती टन साखरेचा कोटा?

Sugar Quota : देशात ९० लाख टन साखर शिल्लक; ऑगस्टसाठी किती टन साखरेचा कोटा?

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या गणेशोत्सवामुळे बाजारात साखरची मागणी वाढणार असल्याने दराचा गोडवा तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या गणेशोत्सवामुळे बाजारात साखरची मागणी वाढणार असल्याने दराचा गोडवा तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्याचा साखर विक्रीचा कोटा जाहीर केला असून, २२.५ लाख टन विक्री करता येणार आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी ८ लाख टन कोटा मिळणार आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या गणेशोत्सवामुळे बाजारात साखरची मागणी वाढणार असल्याने दराचा गोडवा तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारबाजारातील साखरेचे भाव आणि उपलब्ध साखर याचा ताळमेळ घालून महिन्याला साखर विक्रीचा कोटा कारखान्यांना देते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात २२ लाख टन दिला होता, यंदा त्यात वाढ केली असून २२.५ लाख टन कोटा दिला आहे.

ऑगस्ट महिन्यात श्रावण मास आणि गणेश चतुर्थी सण येतात. त्यामुळे साखरची मागणी देशभरात, विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व पश्चिम भारतात मागणी वाढते.

यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. साखरच्या दरात थोडी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

देशात ९० लाख टन साखर शिल्लक
साखर कारखान्यांचा हंगाम दोन-अडीच महिन्यांवर आहे. देशात २० लाख टन साखर शिल्लक आहे. आगामी हंगामातील उत्पादनाचा अंदाज घेऊन आगामी काळातील साखर विक्रीचा कोटा सरकार जाहीर करेल.

गेल्या वर्षीच्या कोट्यात थोडी वाढ झाली असली तरी मागणी पाहता आगामी काळात साखरच्या दरात वाढ होऊ शकते. त्यामुळेसाखर उद्योग व व्यापार क्षेत्रातील घटकांनी मागणीचा कल व पुरवठा साखळी यावर बारकाईने लक्ष ठेवावे. - पी. जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक

अधिक वाचा: आता हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; २५ हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसणार

Web Title: Sugar Quota : 90 lakh tonnes of sugar left in the country; How many lakh tonnes of sugar quota for August?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.