Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Subsidy: शेतकरी बांधवांनो, अनुदानावर बियाणे हवेय, मग ‘इथे’ करा संपर्क

Subsidy: शेतकरी बांधवांनो, अनुदानावर बियाणे हवेय, मग ‘इथे’ करा संपर्क

Subsidy to farmers on Seeds via 'MahaDBT' portal | Subsidy: शेतकरी बांधवांनो, अनुदानावर बियाणे हवेय, मग ‘इथे’ करा संपर्क

Subsidy: शेतकरी बांधवांनो, अनुदानावर बियाणे हवेय, मग ‘इथे’ करा संपर्क

Subsidy on Seed खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार आहे. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागणार आहे.

Subsidy on Seed खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार आहे. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागणार आहे.

महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलवर उपलब्ध असलेले अनुदानित बियाणे (Subsidy on seed) शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी आवश्यक वाणासाठी (seeds)  शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल. जिल्ह्यात उपलब्ध असलेले वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

खरीप हंगामासाठी(kharif) राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीत धान्यअंतर्गत सोयाबीन पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण व राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तूर, मूग, उडीद पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण ह्या बाबी राबविण्यात येत आहेत. सोयाबीन वाणाच्या बियाण्यास पीक प्रात्यक्षिकाअंतर्गत चार हजार रुपये प्रतिक्विंटल व प्रमाणित बियाणे वितरण या बाबीअंतर्गत रुपये दोन हजार प्रतिक्विंटल या प्रमाणे अनुदान देय आहे.

प्रमाणित बियाणे वितरण या बाबीअंतर्गत तूर, मूग व उडीद बियाण्याच्या १० वर्षांआतील वाणास पाच हजार प्रतिक्विंटल व १० वर्षांवरील वाणास २५०० प्रतिक्विंटल याप्रमाणे अनुदान देय आहे पीक प्रात्यक्षिकाअंतर्गत तूर, मूग व उडीद १० वर्षांआतील वाणाच्या बियाण्यास १०० टक्के अनुदान देय राहणार आहे. योजनेमध्ये शेतकऱ्यांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होणार आहे. कृषी विभागाने सांगितले.

Web Title: Subsidy to farmers on Seeds via 'MahaDBT' portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.