सोलापूर : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी तसेच शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून होणारा धोका टाळावा, तसेच शेती पिकांवर आलेले संकट कमी करणे.
फवारणीसाठी औषधाची बचत करणे यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी अनुदान ड्रोन देण्याची योजना जाहीर केली आहे.
यामध्ये कृषी पदवीधर शेतकरी, बचत गटाच्या महिला आणि सहकारी संस्थांना जवळपास ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे.
या योजनेतून शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरेदीवर ४० ते ८० टक्के अनुदान दिले जाते. ही योजना प्रामुख्याने नमो ड्रोन दीदी, कस्टम हायरिंग सेंटर्सद्वारे राबविली जात आहे.
शेतीमध्ये फवारणीत अचूकता आणणे आणि मजुरांची टंचाई कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
तसेच विषारी औषधामुळे यापूर्वी शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. तोही कमी होणार आहे. तसेच वेळेचीही बचत होणार आहे.
या योजनेतून असे मिळते अनुदान१) वैयक्तिक शेतकरी : ४०-५०% (कमाल ५ लाख)२) सहकारी संस्था : ७५% पर्यंत (कमाल ७.५ लाख)३) नमो ड्रोन दीदी (महिला बचत गट) : ८०% पर्यंत (कमाल ८ लाख)
या ठिकाणी करावा लागेल अर्ज◼️ ड्रोन योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल किंवा◼️ कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.◼️ त्यासोबत आधार कार्ड, ७/१२ उतारा जोडणे.◼️ तसेच बँक खाते पासबुक, पॅन कार्ड आणि ड्रोन प्रशिक्षण प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
फवारणी ड्रोन आणि नमो दीदी ड्रोन अशा दोन योजना आहेत. त्यापैकी काही तालुक्यातून अर्ज आले आहेत, तर आणखी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक
अधिक वाचा: रॉकेल वाटप नक्की कुठून होणार? पेट्रोल पंप की रेशन दुकानातून? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Maharashtra offers drone subsidies up to ₹10 lakh for farmers, self-help groups, and cooperatives. The scheme aims to modernize farming, reduce pesticide risks, and address labor shortages through drone technology. Apply via MahaDBT or SMAM portal with necessary documents.
Web Summary : महाराष्ट्र किसानों, स्वयं सहायता समूहों और सहकारी समितियों के लिए ड्रोन पर ₹10 लाख तक की सब्सिडी प्रदान करता है। योजना का उद्देश्य ड्रोन तकनीक के माध्यम से खेती का आधुनिकीकरण, कीटनाशक जोखिमों को कम करना और श्रम की कमी को दूर करना है। आवश्यक दस्तावेजों के साथ महाडीबीटी या एसएमएएम पोर्टल के माध्यम से आवेदन करें।