सांगली : यंदा शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात बाजारातसोयाबीनचे दर प्रतिक्विंटल चार हजार ३०० रुपयांवर गेले नाहीत.
दुसरीकडे खरीपातील पेरणीसाठी शेतकऱ्यांची गडबड सुरु असून, सोयाबीन बियाणाचा प्रतिक्विंटल दर ७ हजार ८०० ते ११ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल असल्याचे वास्तव आहे.
काही रासायनिक खतांचे दर स्थिर राहिल्यामुळे दिलासा असला, तरी बियाणांच्या बाबतीत मात्र तशी परिस्थिती नाही. बाजारात सोयाबीन बियाणांची विक्री बाजारभावाच्या तुलनेत तिप्पट दराने होत आहे.
दहा कोटींची बचत?जिल्ह्यात यंदा ४३ हजार ९४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड नियोजित आहे. त्यासाठी १२ हजार ४७७ क्विंटल बियाणे लागेल. बियाणांचा सरासरी दर आठ हजार रुपये गृहीत धरल्यास बियाणांवर जिल्ह्यासाठी ९ कोटी ९८ लाख १६ हजार रुपये खर्च आहे. घरचे बियाणे वापरल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास १० कोटी रुपये बचत होईल.
८० टक्के शेतकरी वापरतात घरचे बियाणेबाजारभाव आणि बियाणाचे दर यात वर्षानुवर्षे मोठी तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्यावर भर दिला आहे. सध्या ८० टक्के शेतकरी स्वतःचे बियाणेच वापरत आहेत.
अधिक वाचा: सरकारजमा झालेल्या या पाच हजार एकर जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार; जाणून घ्या सविस्तर