Pune : यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. यातच हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांना हमीभावा एवढा दर मिळत नाही. आद्रतेचे प्रमाण आणि जास्त उत्पादकता यामुळे सोयाबीन खरेदी केली जात नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे कृषी विभागाने एक परिपत्रक काढले असून जिल्हानिहाय सोयाबीन पिकाची उत्पादकता देण्यात आली आहे. दिलेली उत्पादकता ग्राह्य धरून हमीभाव केंद्रावर सोयाबीनची खरेदी करण्यात यावी अशा सूचना कृषी आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे आता सोयाबीनचे अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.
दरम्यान, शेतकरी अद्यावत तांत्रज्ञानाचा वापर करुन जादाचे उत्पादन घेण्याचा कायम प्रयत्न करत असतात. अशा वेळी जादाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा माल किमान आधारभूत किंमतीमध्ये विक्री करताना अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांना फटका बसतो. यामुळे कृषी विभागाने जिल्ह्यात घेतलेल्या पीक कापणी प्रयोगातील उच्चतम उत्पादन असलेले 25 टक्के पीक कापणी प्रयोगातील उत्पादनानुसार जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता आकडेवारी देण्यात आली आहे.
त्यानुसार मागच्या हंगामातील म्हणजेच २०२४-२५ मधील जिल्हानिहाय सरासरी उत्पादकता अथवा वास्तविक त्यापेक्षा कमी आलेले उत्पादन सोयाबीन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी ग्राह्य धरण्यात यावे. यासोबत कृषी विभागाने दिलेल्या उत्पादकतेचा वापर हा केवळ सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठीच करण्यात यावा. यासोबतच जादा उत्पादनाचा वापर केवळ यंदाच्या म्हणजेच २०२५ च्या खरीपातील सोयाबीनसाठीच लागू राहील अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.
कृषी विभागाने दिलेल्या पत्रकानुसार जिल्हानिहाय सोयाबीनची उत्पादकता
