Join us

Soybean Kharedi : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; सोयाबीन खरेदीची मुदत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:48 IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे.

३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. याआधी १३ जानेवारी पर्यंत सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

गेल्या काही दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांनी याबाबत सरकारकडे मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना फोन करुन याबाबत मागणी केली होती. या मागणीला यश आले.

३१ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार१) सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले.२) फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले की, सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी मा. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांना दूरध्वनी करुन केली होती, ती मागणी त्यांनी लगेच मंजूर करीत ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल.३) मी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांचा अतिशय मनापासून आभारी आहे.

टॅग्स :सोयाबीनराज्य सरकारसरकारशेतकरीकेंद्र सरकारशिवराज सिंह चौहानदेवेंद्र फडणवीसपीकबाजारमहाराष्ट्रनरेंद्र मोदी